CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

महाराष्ट्र जनरल  मजदूर संघटनेच्या प्रयत्नातून महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजने नाकाकामगारांना सेफ्टी किट व गृहपयोगी वस्तूंचे संचचे वाटप

Report by : रामेश्वर काळे

CRIME BORDER | 26 February 2026 | 10:11 AM

महाराष्ट्र जनरल  मजदूर संघटनेच्या प्रयत्नातून महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजने नाकाकामगारांना सेफ्टी किट व गृहपयोगी वस्तूंचे संचचे वाटप

डोंबिवली :-  महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजने अंतर्गत महामंडळाकडून व  महाराष्ट्र जनरल  मजदूर संघटनेच्या  प्रयत्नातून दि 25/02/2026 बुधवार रोजी डोंबिवली पूर्व लेवा भवन येथे सेफ्टी किट व गृहपयोगी वस्तूंचे संच सर्व नाकाकामगारांना वाटप करण्यात आले.  महाराष्ट्र जनरल मजूर संघटना ही गोरगरिब नाका कामगारांच्या न्याय हक्कासाठी सतत लढा देते व शासनाच्या कामगारांसाठी ज्या योजना आहे त्या मिळवून देण्यात सतत प्रयत्नशील राहते. 

त्यामध्ये मुलांची शिष्यवृत्ती ,डिलिव्हरी साठी मिळणारा निधी व वैद्यकीय उपचारासाठी निधी , विवाहासाठी जो शासनाचा निधी कामगारांना मिळतो त्याच्यासाठी ही संघटना सतत प्रयत्नशील राहते. या संघटनेच्या माध्यमातून बऱ्याच कामगारांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे आणि पुढेही तो मिळवून देण्याचा या संघटनेचा मानस आहे. 

या कार्यक्रमासाठी  प्रमुख मान्यवर नगरसेविका सौ . वृषाली रंजीत जोशी, नगरसेविका सौ . शैलेजा लालचंद भोईर  माजी नगरसेवक प्रकाश म्हात्रे, माजी परिवहन सभापती संजय पावशे ,  समाजसेवकडॉ. समीर जगे,  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ठाणे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव उघडे ,  समाजसेवक समाधान तायडे, सहकार भारती  शैलेश दुर्गुडे , क्राईम बॉर्डर चे संस्थापक  राजेंद्र वखरे (सर ) 

महाराष्ट्र  जनरल  मजदूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण मिसाळ , उपाध्यक्ष भीमराव गुंड , युवा अध्यक्ष नामदेव भानुसे, खजिनदार विश्वनाथ रेवगडे, कार्याध्यक्ष कारभारी रेवगडे, सह खजिनदार रामचंद्र वाघ ,सहसचिव गजानन डांगे, केंद्रीय कमिटी सदस्य चंद्रकांत गायकवाड, कमळकर पाटील,  रामेश्वर शेजुळ,  बद्रीनाथ मखरे  , केशव मिसाळ ,डोंबिवली शहर अध्यक्ष वंदनाताई जाधव व ठाणे  जिल्हाध्यक्ष रामेश्वर काळे व उपस्थित सर्व नाका कामगार व सर्व महाराष्ट्र जनरल  मजदूर संघटनेचे पदाधिकारी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सर्व गोरगरीब नाका कामगारांना सेफ्टी किट संच व ग्रुप वस्तू या वाटप करण्यात आल्या .