CRIME BORDER | 28 February 2026 | 11:17 AM
पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणारे एकमेव "क्राईम बॉर्डर" च्या भुसावळ तालुका प्रतिनिधी पदावर वरणगाव येथील समाजसेवक दीपक इंगळे यांच्या सामाजिक कार्याची विशेष दखल घेऊन नाशिक विभागीय संपादक डॉ. शशिकांत काळे यांच्या विशेष शिफारशीवरून क्राईम बॉर्डर चे मुख्य संपादक राजेंद्र वखरे यांनी मानसेवी नियुक्ती जाहीर केली आहे.
दीपक सुधाकर इंगळे यांना सामाजिक व जनसेवेच्या कार्याची आवड असून गोरगरिबांसाठी "क्राईम बॉर्डर" व "क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन" (एनजीओ) च्या माध्यमातून त्यांना सामाजिक कार्य करायचे आहे. त्यांच्या या निवडीने आप्त , मित्र परिवार व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.