CRIME BORDER | 01 March 2026 | 09:34 AM
‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या जीवनचरित्रातून एकात्मतेचा व मानवतेचा संदेश प्रसारित होत असल्याने समागम कार्यक्रमांतर्गत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार नमुंमपा शिक्षण विभागाच्या वतीने 10 फेब्रुवारीपासूनच महापालिका क्षेत्रातील 435 शाळांमध्ये दररोज सुप्रसिध्द गायक श्री.सतिंदर सरताज यांचे हिंद-दी-चादर हे भक्तीगीत विद्यार्थ्यांसमोर प्रक्षेपित करण्यात आले तसेच त्यांचे चरित्र व इतिहास कळण्यासाठी डॉक्युमेंटरीही दाखविण्यात आली. सर्व शाळांमध्ये प्रभातफे-यांचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये 2,46,297 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. वक्तृत्व स्पर्धेत 37,350 तसेच निबंध स्पर्धेत 2,26,940 विद्यार्थी सहभागी झाले. चित्रकला स्पर्धेतून 2,21,815 विद्यार्थ्यांनी आदरांजली अर्पण केली तर 33,653 विद्यार्थ्यांनी वाचन स्पर्धेत सहभाग घेतला. एकल व समुह भक्तीगीत गायन स्पर्धेत तब्बल 2,26,734 विद्यार्थी सहभागी झाले. याबाबतच्या स्पर्धात्मक परीक्षेतही 1,27,981 विद्यार्थ्यांनी उत्साही सहभाग घेतला. शासन निर्देशानुसार या सर्व उपक्रमांचे जिओ टॅगींग 12980 फोटो व 3571 व्हिडीओ शासनाने निर्देशित केलेल्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आले.
हिंद-दी-चादर अंतर्गत नमुंमपा आरोग्य विभागाच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 152 ठिकाणी आरोग्य शिबीरे राबविण्यात आली ज्याचा लाभ 18850 नागरिकांनी घेतला.
त्याचप्रमाणे 89 ठिकाणी राबविण्यात आलेल्या हिंद-दी-चादर अंतर्गत सखोल स्वच्छता मोहीमांमध्ये स्वच्छतादूतांसह 10,393 नागरिकही सहभागी झाले.
या कार्यक्रमाच्या प्रचार प्रसिध्दीसाठी 15 डिजीटल बोर्ड, 25 बॅकलेट डिस्प्ले बोर्ड, 33 मोठे होर्डींग, 7 टोलनाका व कमानींवरील गॅन्ट्री बोर्ड, 125 बॅक टू बॅक इलेक्टिरल पोल पॅनल, 40 X 6 आकाराचे 4 स्कायवॉक होर्डींग, 15 X 6 आकाराचे 80 लाकडी होर्डींग, 50 एनएमएमटी बसेसवर रॅपींग आणि 75 बसस्टॉपवर बॅनर्स अशी व्यापक प्रसिध्दी करण्यात आली.
नमुंमपा क्षेत्रातील 5 सिनेमागृहांतील 29 स्क्रिन्सवर दररोज शोपूर्वी आणि मध्यंतरात श्री.सतिंदर सरताज यांचे हिंद-दी-चादर भक्तीगीत प्रसारित करण्यात आले. नमुंमपा मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथेही दररोज भक्तीगीत प्रसारण झाले.
सर्व नागरिकांना एकत्र घेऊन विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांस उदंड प्रतिसाद लाभला.
याशिवाय नवी मुंबई महानगरपालिकेची वेबसाईट, फेसबुक, ट्विटर, इन्स्टा, व्हॉट्सॲप अशा अकाऊंटवरूनही सातत्यपूर्ण प्रसिध्दी करण्यात आली आहे.
दि. 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च या दोन दिवसांमध्ये संपन्न होणारा ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांची 350 वा शहिदी समागम कार्यक्रम सुव्यवस्थित रितीने पार पाडण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका नियोजनबध्द कार्यवाही करीत असून नागरिकांनी ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांना अभिवादन करण्यासाठी आवर्जून खारघर सेक्टर 29 येथील ओवे मैदानात संपन्न होणा-या समागम स्थळास भेट द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.