CRIME BORDER | 01 March 2026 | 10:49 AM
डोंबिवली : - पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणारे एकमेव "क्राईम बॉर्डर" च्या महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी पदावर कल्याण येथील सुधीर बाजपेयी (सर) यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची विशेष दखल घेऊन क्राईम बॉर्डर चे मुख्य संपादक राजेंद्र वखरे यांनी मानसेवी नियुक्ती जाहीर केली आहे.
सुधीर बहादूर बाजपेयी (सर) यांना शैक्षणिक ,सामाजिक व जनसेवेच्या कार्याची आवड असून गोरगरिबांसाठी "क्राईम बॉर्डर" व "क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन" (NGO) च्या माध्यमातून त्यांना सामाजिक कार्य करायचे आहे. त्यांच्या या निवडीने आप्त , मित्र परिवार व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.