CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

पिंपळगाव बुद्रुक येथील ६ वर्षीय बालिकेचा विषारी सर्पदंशाने मृत्यू

क्राईम बॉर्डर टीम

CRIME BORDER | 01 March 2026 | 11:47 AM

पिंपळगाव बुद्रुक येथील ६ वर्षीय बालिकेचा विषारी सर्पदंशाने मृत्यू

जामनेर :- तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येथील एका ६ वर्षीय बालिकेचा विषारी साप चावल्याने मृत्यू झाला. असून वडिलांनी आपल्या मुलीला वाचवण्यासाठी मोठी धावपळ केली मात्र ती व्यर्थ ठरली.पिंपळगाव बुद्रुक येथे नदीकाठी अनेक कुटुंब वास्तव्यास आहेत. याच ठिकाणी एक कुटुंब पती पत्नी एक मुलगा व दोन मुलीसह राहतात. मंगळवारी दुपारी दीड वाजे सुमारास बहिण, भाऊ खेळत असताना सहा वर्षीय मुलीला सर्पदंश झाला. तिने आरडाओरड करून वडिलांना साप चावल्याचे सांगितले. वडिलांनी सापाचा शोध घेतला मात्र साप दिसला नाही.

वडिलांनी मुलीला मोटारसायकल वरून तात्काळ पहूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्या ठिकाणी प्राथमिक तपासणी करून डॉक्टरांनी जळगावला नेण्याचा सल्ला दिला. मात्र मुलीला  घेऊन जात असताना रस्त्यातच तिची  प्राणज्योत मावली.जळगाव येथील दवाखान्यात पोहोचताच डॉक्टरांनी ,मुलीला  मृत घोषित केले. या घटनेमुळे पिंपळगाव बुद्रुक परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांनी ग्रामीण भागात सर्पदंश प्रतिबंधक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.