CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

कोणत्याही खाजगी अथवा अनधिकृत / शालेय परवाना नसलेल्या वाहनातून शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांना आपल्या पाल्यास शाळेत पाठवू नये

CRIME BORDER | 02 March 2026 | 04:26 PM

No image available

ठाणे  :- बदलापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद क्र. 56/2026, दि.25 फेब्रुवारी 2026, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012, कलम 12, 8. तसेच भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.) कलम 74, 75, 79 नुसार नोंदविण्यात आला आहे. या गुन्हयातील आरोपी वाहनचालक इसम नामे जयेश काळूराम मुने हा असून गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन मोटार बस क्र. MH-05AZ-0754 हे बस संवर्गातील वाहन आहे. या अत्याचाराची घटना नमूद वाहनांमध्ये झाल्याची नोंद एफ.आय.आर. मध्ये करण्यात आले आहे. तसेच गुन्ह्यातील जप्त वाहनास मोटार वाहन नियमाप्रमाणे रु.19 हजार 500/- दंडात्मक कारवाई करून वाहनाची नोंदणी निलंबन करण्याकरिता वाहनमालकास कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गुन्ह्यातील आरोपी वाहनचालक यांची अनुज्ञप्ती निलंबित करण्यात आली आहे.

माहे एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत एकूण 730 वाहनांवर स्कुलबस नियमाप्रमाणे कारवाई करून रु.11 लाख 32 हजार 250/- इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

तरी कोणत्याही खाजगी अथवा अनधिकृत / शालेय परवाना नसलेल्या वाहनातून सर्व शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांच्या पाल्यास विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू नये, असे आवाहन कल्याणचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी केले आहे.