CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

पिंपळगाव खुर्द येथे एका १४ वर्षीय मुलाचा शॉक लागून मृत्यू

भुसावळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी : सुरेश कोळी

CRIME BORDER | 02 March 2026 | 07:55 PM

पिंपळगाव खुर्द येथे एका १४ वर्षीय मुलाचा शॉक लागून मृत्यू

भुसावळ :- वरणगाव येथून जवळच  असलेल्या पिंपळगाव खुर्द येथे एका १४ वर्षीय मुलाच्या मृत्यूने संपूर्ण गावात हळहळ पसरली आहे . धीरज योगेश कोळी हा पिंपळगाव येथील हरी किटकुल बढे प्राथमिक विद्यालयात शिकत होता . तो दिनांक १ मार्च रोजी दुपारी १ वाजता घरात एकटा असताना नळाला पाणी आल्याने पाणी भरण्यासाठी इलेक्ट्रिकल मोटार प्लगमध्ये जोडत असताना अचानक शॉक लागल्यामुळे तो जमिनीवर कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना घडली त्यावेळी धीरजचे आई-वडील शेतात गेले होते आणि तो घरात एकटाच होता . अचानक झालेल्या या घटनेने गावामध्ये शोककळा पसरली असून सर्वत्र धीरजच्या मृत्यूची चर्चा सुरू आहे. धीरजच्या  पश्चात आई-वडील, आजी ,एक मोठा भाऊ असा परिवार आहे. धीरज हा हुशार,होतकरू ,मैत्रीशील आणि अभ्यासात उत्कृष्ट विद्यार्थी होता शिक्षक आणि मित्र परिवाराने त्याच्या अचानक निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे .