CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

गर्भाशय मुखाच्या कर्करोग प्रतिबंधासाठी एचपीव्ही लसीकरण मोहिमेस प्रारंभ

९ जानेवारीपासून सर्व आरोग्य केंद्रांत लस उपलब्ध

CRIME BORDER | 04 March 2026 | 05:59 PM

No image available

ठाणे :-  गर्भाशय मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) प्रतिबंधासाठी जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत सर्व आरोग्य केंद्रांमध्ये एचपीव्ही (HPV) लस उपलब्ध करून देण्यात आली असून दि. ९ मार्च, २०२६ पासून लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात येणार आहे. या मोहिमेचे उद्घाटन दि. ८ मार्च रोजी करण्यात येणार आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी सर्व पात्र मुली व महिलांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या विशेष मार्गदर्शनाने ही लसीकरण मोहिम ९ जानेवारीपासून पुढील तीन महिने राबविण्यात येणार असून त्यानंतरही नियोजित ठिकाणी नियमित लसीकरण सेवा उपलब्ध राहील.

गर्भाशय मुखाचा कर्करोग म्हणजे काय?
गर्भाशयाच्या खालच्या टोकाच्या भागाला ‘सर्व्हिक्स’ (Cervix) म्हणतात. या भागात होणारा कर्करोग म्हणजे गर्भाशय मुखाचा कर्करोग होय. हा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता वाढू शकतो, त्यामुळे वेळेवर तपासणी आणि प्रतिबंधात्मक लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे.
जवळपास ९९.७ टक्के गर्भाशय मुखाचे कर्करोग ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) मुळे होतात. बहुतेक एचपीव्ही संसर्ग लक्षणरहित असतात आणि १ ते २ वर्षांत आपोआप बरे होतात. मात्र काही प्रकार दीर्घकाळ टिकून राहिल्यास कर्करोगपूर्व अवस्था (CIN-1, CIN-2, CIN-3) निर्माण होऊन पुढे कर्करोग होऊ शकतो.

एचपीव्ही विषाणूविषयी माहिती
एचपीव्ही हा ‘पॅपिलोमाविरिडे’ (Papillomaviridae) कुटुंबातील दुहेरी धाग्याचा डीएनए विषाणू आहे. याचे २०० हून अधिक प्रकार आढळतात. त्यापैकी काही ‘कमी धोका’ तर काही ‘जास्त धोका’ (कर्करोग निर्माण करणारे) प्रकार म्हणून ओळखले जातात.
सध्या एचपीव्हीचे १७ प्रकार जास्त धोकादायक मानले गेले आहेत. जगभरातील गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या सुमारे ७७ टक्के आणि भारतातील सुमारे ८३ टक्के प्रकरणांसाठी HPV १६ आणि HPV १८ हे प्रकार प्रमुख कारणीभूत ठरतात.
एचपीव्ही संसर्गामुळे केवळ गर्भाशय मुखाचाच नव्हे तर गुदद्वार, घसा (oropharyngeal), योनीमार्ग (vulvar, vaginal) आणि पुरुषांमध्ये लिंगाचा कर्करोग होण्याचा धोका देखील असतो.

सुरुवातीची लक्षणे
सुरुवातीच्या टप्प्यात सहसा कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. मात्र पुढील लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा :
* शरीरसंबंधानंतर, दोन मासिक पाळीच्या दरम्यान किंवा रजोनिवृत्तीनंतर योनीतून रक्तस्त्राव
* पाणीदार किंवा रक्तमिश्रित, दुर्गंधीयुक्त स्त्राव
* तपासणीदरम्यान गर्भाशय मुखाचा भाग असामान्य दिसणे किंवा स्पर्शाने रक्तस्त्राव
रोग वाढल्यास :
* गर्भाशय मुखावर गाठ दिसणे
* ओटीपोटात वेदना किंवा शरीरसंबंधावेळी वेदना
* पायात कळा येणे (सायटिका)
* ‘फिस्टुला’ तयार होणे


लसीकरणाचे महत्त्व
एचपीव्ही लस ही गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरुद्ध प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे. योग्य वयात लसीकरण केल्यास भविष्यात कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.
जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा शासकीय रुग्णालय / जिल्हा रुग्णालय मध्ये ही लस उपलब्ध करण्यात आली असून नागरिकांनी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधून लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

या मोहिमेत Gardasil-4 (Quadrivalent – प्रकार ६, ११, १६, १८ विरुद्ध संरक्षण देणारी) लस वापरण्यात येणार असून ती +२° ते +८° सेल्सिअस तापमानात साठवली जाणार आहे. ही लस गोठविण्यास संवेदनशील (freeze sensitive) असल्याने शीतसाखळीचे काटेकोर पालन केले जाणार आहे. VVM-30 यंत्रणेद्वारे लसीची गुणवत्ता तपासली जाईल. लसीचा एकच डोस (Single-dose schedule) ०.५ मिली इतका असून तो डाव्या वरच्या बाहूच्या स्नायूमध्ये (IM) देण्यात येईल.

लसीकरणासाठी AAM-PHCs, U-PHCs, CHCs, SDH, DH तसेच GMC&H या आरोग्य संस्थांमध्ये CCP, वैद्यकीय अधिकारी, इंटरनेट सुविधा, प्रिंटर व संगणक/लॅपटॉप उपलब्ध ठेवण्यात येणार आहेत.

ही विशेष एचपीव्ही मोहिम तीन महिने दररोज राबविण्यात येईल. त्यानंतर नियमित लसीकरण सत्रांच्या दिवशी त्याच आरोग्य संस्थांमध्ये सेवा सुरू राहील.

या मोहिमेअंतर्गत १४ वर्षे पूर्ण केलेल्या (१४ वा वाढदिवस साजरा केलेला परंतु १५ वा वाढदिवस अद्याप न झालेल्या) मुली हे लक्ष्यित गट असतील. जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या सुमारे १ टक्के मुली या वयोगटात येतात.

लसीकरणासाठी प्रशिक्षित पथकाची नियुक्ती करण्यात आली असून त्यामध्ये लसीकरण करणारे (ANM/LHV/नर्स), जनजागृती व मोबिलायझेशन करणारे (ASHA/AWW/Link Worker), पडताळणी करणारे आरोग्य कर्मचारी तसेच स्वयंसेवक (महिला आरोग्य समिती/जन आरोग्य समिती/आरोग्य कर्मचारी) यांचा समावेश असेल.

“गर्भाशय मुखाचा कर्करोग हा टाळता येण्याजोगा आणि लवकर निदान झाल्यास पूर्णपणे बरा होऊ शकणारा आजार आहे. एचपीव्ही लसीकरण हे प्रभावी प्रतिबंधात्मक पाऊल आहे. सर्व पात्र मुलींनी पुढाकार घेऊन लसीकरण करून घ्यावे. तसेच पालकांनीही आपल्या मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने जागरूक राहून या मोहिमेत सहभागी व्हावे,” असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी केले आहे.