CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

अखिल भा. म पत्रकार परिषद मुंबई संलग्न पुणे जि. महिला व लोणावळा शहर पत्रकार संघ  यांच्या संयुक्त विद्यमाने महिलादिनानिमित्त महिला पत्रकार व रणरागिणीचा सन्मान सोहळा

CRIME BORDER | 03 April 2026 | 10:51 PM

अखिल भा. म पत्रकार परिषद मुंबई संलग्न पुणे जि. महिला व लोणावळा शहर पत्रकार संघ  यांच्या संयुक्त विद्यमाने महिलादिनानिमित्त महिला पत्रकार व रणरागिणीचा सन्मान सोहळा

श्रावणी कामत 

लोणावळा -. लोणावळा येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न पुणे जिल्हा महिला पत्रकार व लोणावळा
शहर पत्रकार संघाच्या वतीने राज्यस्तरीय महिला पत्रकार व रणरागिणीना सन्मानित करण्यात आले . कार्यक्रम
सुरवात महिलादिन विशेष काव्य मैफिलीने करण्यात आली. 

 

सादरकर्त युवा साहित्य प्रतिष्ठान मुंबई, कवी संतोष खारटमोल, कवी आनंद रांजणे ,कवी ओमकार देसाई ,कवीयत्री सविता देशमुख यांनी अप्रतिम कवी मैफिल जमवली त्यात एक छोटी कलाकार मृण्मई काळे व शोभा आहेर यांनी सुंदर कविता सादर केली. स्वागत गीत सुनिल मस्के यांनी आपल्या सुरेख व दमदार आवाजात- जय जय महाराष्ट्र माझा सादर केले. प्रस्तावना पुणे जिल्हा अध्यक्ष श्रावणी कामत यांनी केली कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा.सारिकाताई सुनिल आण्णा शेळके ह्या होत्या.


अखिल भारतीय मराठी पत्रकार  परिषद अध्यक्षा शोभा जयपुरकर, सरचिटणीस विद्या म्हासूर्णेकर, जिल्हा अध्यक्ष सुनिल लोणकर, राज्य कार्यकारणीचे सदस्य अनिल वडघुले, जेष्ठ पत्रकार चंद्रकांत जोशी, नगराध्यक्ष राजेन्द्र सोनावणे, नंदकुमार वlळंज (उद्योजक ) व जेष्ठ पत्रकार कुमठकर श्रीराम यांनी मनोगत व्यक्त केल्या. परिषदेचे मुख्य विश्वस्त एस .एम. देशमुख यांच्या मार्गदर्शन खाली हा कार्यक्रम व महिला हे घर सांभाळून बाहेरची काम करतात त्यांना त्यांच्या कामाची पावती व पाठीवर थाप मिळावी हा छोटा सा प्रयत्न होता .

त्याना पुढील कार्यास शुभेच्या व अभिनंदन. वसंत व्याख्यान माला लोणावळा, नेतृत्व बचत गट, वुमन्य फाउडेशन, इंडियन स्काउट गाईड फेलोशिप लोणावळा गिल्ड.. आधारस्तंभ बचत गट, वैदही बचत गट, निवारा वृद्धाश्रम च्या छाया काळे 
हिरकणी महिला स्वयंसहायता बचत गट, सिधुताई कविश्वर, डॉ, सिमा शिंदे परमेश्वरी दामले, विभावरी इंगळे, नयना आभाळे,
दक्षता कमिटी, दामिनी पथक, जेष्ठ नागरीक संघ.यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व महिला पत्रकारांचे ट्रॉफी व शाल देऊन सन्मान करण्यात आले.


या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सारिका ताई शेळके, दिपालीताई हुलावळे , रेश्मा देवकर, नंदकुमार वlळंज (उद्योजक),अनिल वडघुले, सुनिल लोणकर (जिल्हा अध्यक्ष ), राजेद्र सोनावणे(नगराध्यक्ष ) सभापती स्वप्ना  कदम,नारायण पळिकर, शोभा जपुरकर, विद्या म्हासुर्णेकर, लोणावळा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष adv संजय पाटील, पुणे शहर अध्यक्ष प्रमोद गव्हाणे,विशाल विकारी,माऊली भोसले,प्रशांत पुराणिक,बापु पाटील, श्रीराम कुमठेकर, जेष्ठ पत्रकार चंद्रकांत जोशी ,डॉ. हेमंत अगरवाल,मा.नगरसेविका ब्रिन्दा गणत्रा,उमा मेहता, सुषमा कडू सुजाता गुरव  रेखा भेगडे ,प्रज्ञा आबनवे,वर्षा चव्हाण,सुनिता आगळे,आदी मान्यवर उपस्थित होते तसेच आदित्य कामत,प्रफुल सोनवणे सुनिल मस्के, अवनी आगळे 
यांचा कार्यक्रमांस मोलाचा वाटा सूत्रसंचालन सुनिता कसबे व रश्मी शिरसकर तर आभार शोभा जयपुरकर यांनी मानले.