Important:
रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register
डोंबिवली (प्रधान कार्यालय) :- पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणारे एकमेव "क्राईम बॉर्डर" च्या अंबरनाथ शहर प्रतिनिधी पदावर अंबरनाथ येथील भरत प्रदीप श्रीखंडे यांच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्याची विशेष दखल घेऊन क्राईम बॉर्डर चे मुख्य संपादक राजेंद्र वखरे यांनी त्यांची मानसेवी नियुक्ती जाहीर केली आहे.
भरत प्र. श्रीखंडे यांना सामाजिक , सांस्कृतिक , पत्रकारिता व जनसेवेच्या कार्याची आवड असून गोरगरिबांसाठी "क्राईम बॉर्डर" व "पावन भूमी चॅरिटेबल ट्रस्ट" (एनजीओ) च्या माध्यमातून त्यांना सामाजिक कार्य करायचे आहे. त्यांच्या या निवडीने आप्त , मित्र परिवार व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.