CRIME BORDER | 05 May 2026 | 09:37 AM
डोंबिवली (प्रतिनिधी) : टिळकनगर पोलीस स्टेशन, डोंबिवली येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) श्री. जयेंद्रकुमार भोयर यांची नुकतीच पोलीस निरीक्षक (PI) पदावर पदोन्नती झाली असून त्यांनी मुंबई येथे नव्या पदावर रुजू होऊन कार्यभार स्वीकारला आहे.
शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष आणि अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध अशी त्यांची ओळख आहे. मानपाडा पोलीस स्टेशन (डोंबिवली) तसेच शिवाजीनगर पोलीस स्टेशन (अंबरनाथ) येथे त्यांनी डिटेक्शन ब्रांचची जबाबदारी सांभाळत अनेक गुंतागुंतीचे व किचकट गुन्हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या उघडकीस आणले आहेत.
पोलीस खात्यातील त्यांचे कार्य, तपास कौशल्य आणि जनतेशी असलेला संवेदनशील संवाद यामुळे ते सहकाऱ्यांमध्ये तसेच जनमानसात एक आदर्श अधिकारी म्हणून ओळखले जातात.
त्यांच्या या यशस्वी वाटचालीबद्दल ‘क्राईम बॉर्डर’ परिवारातर्फे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या भावी कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.