CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

मीरा बोरवणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी ;

CRIME BORDER | 05 May 2026 | 07:33 PM

मीरा बोरवणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी ;

मुंबई : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राज्य सरकारने अखेर अत्यंत अनुभवी आणि कणखर अशा नेतृत्वाची निवड केली आहे. निवृत्त आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांची या पदावर नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त होते. बोरवणकर यांच्या नियुक्तीचे सर्वच स्तरांतून स्वागत होत आहे

.  
पोलीस दलात आपल्या धाडसी आणि परिणामकारक कामगिरीमुळे ‘लेडी सुपरकॉप’ अशी ओळख निर्माण करणाऱ्या मीरा बोरवणकर यांना कठीण आणि संवेदनशील प्रकरणे हाताळण्याचा मोठा अनुभव आहे. १९८१ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी असलेल्या बोरवणकर या महाराष्ट्र केडरमधील पहिल्या महिला आयपीएस अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा यशस्वी तपास झाला असून गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.पोलीस सेवेत असताना प्रशासन, तपास आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या क्षेत्रात त्यांनी आपली स्वतंत्र छाप उमटवली होती.

 

आता राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून त्यांच्याकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असणार आहेत महिलांच्या हक्कांचे प्रभावी संरक्षण करणे, अत्याचारग्रस्त महिलांना जलद न्याय मिळवून देणे, महिला सक्षमीकरणाच्या शासकीय उपक्रमांना गती देणे.दरम्यान, त्यांच्या कार्यक्षमतेचा आणि अनुभवाचा महिलांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीत निश्चितच मोठा उपयोग होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रशासकीय पकड आणि सामाजिक प्रश्नांची जाण असलेल्या बोरवणकर यांच्या नियुक्तीमुळे महिला आयोगाच्या कामकाजात अधिक स्पष्टता आणि वेग येईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
बातमी सौजन्य :- दैनिक प्रजापत्र