CRIME BORDER | 28 May 2026 | 10:38 AM
बेटावद बु .ता. जामनेर :- बेटावद बु येथील शेतमजरावर वन्यप्राणी बिबट्या ने हल्ला करून जखमी केले असून सुदैवाने सहकारी मजुरांच्या आरडा ओरडा केल्या मुळे बिबट पळुन गेला.
देवळसगाव शिवारात डॉ. आगीवाल यांच्या शेतात शेत मजुर संतोष पारधी हे काम करत असतांना अचानक वन्यप्राणी बिबट्याने हल्ला केला पण सुदैवाने जवळपास असलेल्या सहकाऱ्याच्या प्रयत्नामुळे बिबट्याने तिथुन पळ काढला . सतोष पारधी यांना तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र बेटावद बु. येथे प्रथमोपचार करून जामनेर येथे रवाना करण्यात आले संतोष यांच्या मानेवर व शरीरावर बिबट्याच्या नखांन मुळे जखमा झाल्या .
सदर माहिती वनविभागस मिळताच तात्काळ वनपाल प्रसाद भारुडे , वनरक्षक जितेंद्र चिंचोले ,वाहन चालक पालवे ,वनमजुर इकबाल कंजर यांच्या टिमने घटना स्थळी धाव घेऊन पंचनामा वनपरिक्षेत्र अधिकारी सुरज आवारे यांचे मार्गदर्शना खाली करून जखमी . इसम संतोष पारधी यांना ग्रामस्थाच्या मदतीने व विशाल यांच्या मदतीने जामनेर शासकिय रुग्नालयात उपचार करून घेतले
वनविभागाशी संपर्क करता त्यांच्या कडून माहीती देण्यात आली. सदर कार्यवाही ही उपवनसंरक्षक जळगांव , सहा वनसंरक्षक जळगांव व वनपरिक्षेत्र अधिकारी जामनेर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.