CRIME BORDER | 30 May 2026 | 11:14 PM
डोंबिवली : देशातील सर्वात प्रतिष्ठेची समजली जाणारी केंद्रीय लोकसेवा आयोगाची म्हणजेच UPSCच्या परीक्षेत डोंबिवलीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र वखरे यांचे सुपुत्र कु. शिवम वखरे याने उत्तुंग यश संपादन केले आहे. त्यांची आय.आर.एस पदासाठी निवड होऊ शकते . या उल्लेखनीय यशामुळे जळगाव व डोंबिवलीकरांची मान अभिमानाने उंचावली आहे.कु. शिवम याचे प्रशिक्षण लवकरच उत्तराखंडमधील मसुरी येथे सुरू होणार आहे.
कु . शिवम याने अथक मेहनत, जिद्द आणि अभ्यासातील सातत्याच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीत हे यश मिळवत आपल्या कुटुंबाचे तसेच डोंबिवली शहराचे व आपले मूळ गांव बेटावद बुद्रुकचे नाव उज्ज्वल केले आहे. हे यश अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल.
डोंबिवलीतील रहिवाशी खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात खानदेश व विदर्भाच्या बॉण्ड्रीवर असलेल्या बेटावद बुद्रुक येथील मूळ निवासी व ज्येष्ठ पत्रकार व क्राईम बॉर्डर चे संपादक राजेंद्र वखरे तथा श्री स्वामी सखा (मासिकाच्या) संपादिका सौ.सीमा राजेंद्र वखरे यांचे ते सुपुत्र आहेत .
राजेंद्र वखरे हे M.A, B.P.Ed, M.C.J असून पत्रकारितेबरोबर त्यांनी सतरा वर्ष सिम्बॉयसिस कॉन्व्हेंट हायस्कूल मुंब्रा येथे प्राथमिक व माध्यमिक क्रीडा शिक्षक म्हणून कार्य केले . त्यांचे स्वतःचे क्राईम बॉर्डर वृत्तपत्र ते २०१० पासून ते चालवितात. क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (N.G.O.) च्या माध्यमातून ते सामाजिक कार्य ही करतात.
सौ.सीमा वखरे यांचे माहेर जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात असलेले आमडदे हे असून ह्या , B.A, MCJ असून त्या श्री स्वामी सखा (मासिक) साप्ताहिक निसर्ग चक्र व आश्रय महिला संस्थेच्या माध्यमातून पत्रकारिता व सामाजिक कार्य करतात.
कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे यांचे मूळ गाव बेटावद बुद्रुक असले तरी त्यांचे संपूर्ण बालपण व शिक्षण डोंबिवली, कल्याण मध्ये गेले.
त्यांचे प्राथमिक शिक्षण गुरुकुल विद्यालय, कल्याण व माध्यमिक शिक्षण होली क्रॉस इंग्लिश मिडीयम स्कूल, डोंबिवली व ज्युनियर कॉलेज त्यांनी प्रख्यात अशा बिर्ला कॉलेज कल्याण येथे केले.तर त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतील प्रख्यात अशा रुईया कॉलेज माटुंगा, मुंबई या ठिकाणी झाले .
त्यांनी स्टॅटिस्टिक (सांख्यिकी) पदवी घेतल्यानंतर यूपीएससीची तयारी सुरू केली तसे पाहता त्यांनी शालेय जीवनापासूनच UPSC युपीएससीच्या परीक्षा देऊन आपल्या देशासाठी देशातील नागरिकांसाठी कार्य करण्याचे ठरविले. त्यांना दहावी ९३% तर बारावी मध्ये ८४% च्या वर मार्क्स होते तर सर्वोत्तम यश मिळवत ते सांख्यिकी शाखेत पदवीधर झाले.
घरातील शैक्षणिक व सामाजिक वातावरण असल्याने त्यांना शिक्षणाची व समाजकार्याची आवड शालेय व कॉलेज जीवनामध्येच लागली होती त्यांनी एन.एस.एस व पावन भूमी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले.
पदवीच्या निकालानंतर त्यांनी जोमाने खडतर अशा UPSC यूपीएससीच्या अभ्यासक्रमाला सुरुवात केली. यासाठी त्यांनी थेट दिल्ली गाठत तिथे अभ्यासाचे धडे गिरवले. तिथे सव्वा वर्ष राहून आल्यावर घरूनच अभ्यास केला.
पहिल्या २०२३ च्या प्रयत्नात त्यांनी प्रीलियम व मेन्स पर्यंत पल्ला गाठला पहिल्या प्रयत्नात त्यांना यश आले नाही .दुसऱ्या प्रयत्नात २०२४ मध्ये त्यांनी मुलाखतीपर्यंत मजल मारली तिथे मात्र त्यांना १४ मार्काने अपयश आले परंतु त्यांनी खचून न जाता स्वतःसह आई-वडिलां व लहान भावाचे स्वप्न साकार करण्यासाठी जिद्दीने अभ्यास सुरू केला आणि तिसऱ्या प्रयत्नात २०२५ मध्ये त्यांनी उत्तुंग भरारी घेत संघ लोकसेवा आयोगाच्या UPSC (यु .पी .एस .सी ) च्या परीक्षेत ६५१ रँक मिळवून यश संपादन केले.
दररोज कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे यांनी ८ ते १० तास अभ्यास केला, काही वेळेस १२, १४ तास अभ्यास केला व यश संपादन करून हल्ली राहत असलेल्या डोंबिवली शहराच्या व बेटावद बुद्रुक आपल्या मूळ गावाच्या मुकुटात मानाचा तुरा खोवला.
या अद्वितीय यशासाठी शिवम व त्यांच्या आई-वडिलांचे, गुरुजनांचे मन:पूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
संपादन : रामचंद्र खडपे / सुहास कांबळे
दैनिक : द ग्लोबल टाइम्स / ठाणे प्रतिष्ठा टाइम्स ..
[ UPSC, IPS/IRS, Shivam Vakhare, UPSC Success, Pride of Dombivli,]