CRIME BORDER | 30 May 2026 | 11:37 PM
जळगाव :- अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासन, जळगाव कार्यालयाच्या पथकाने २७ मे २०२६ रोजी मु. पो. भोकर, ता. जि. जळगाव येथील “श्री चक्रधर रेस्टॉरंट अॅण्ड कोल्ड्रींक्स” या आस्थापनाची अचानक तपासणी केली.
या तपासणीदरम्यान संबंधित आस्थापनातून दोन अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले असून प्रकरणी पुढील कारवाई अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत करण्यात येत असल्याची माहिती सहायक आयुक्त (अन्न व औषध प्रशासन) स. कृ. कांबळे यांनी दिली.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे तसेच सह आयुक्त (नाशिक विभाग) श्रीकांत करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
अन्नपदार्थांच्या गुणवत्ता व दर्जाबाबत नागरिकांनी सतर्क राहून तक्रारी असल्यास १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर किंवा acfdajalgaon@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा. तसेच अन्न व औषध प्रशासन कार्यालय, आंबेडकर मार्केट, जळगाव येथे प्रत्यक्ष संपर्क साधण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.