CRIME BORDER | 01 June 2026 | 11:05 AM
डोंबिवली (कार्यालय प्रतिनिधी) : सेवानिवृत्त कृषी पर्यवेक्षक श्री . प्रभाकर श्रावण वखरे यांचा आज सुरत येथे ७० वा वाढदिवस सर्व कुटुंब व स्नेही यांच्या समवेत सायंकाळी साजरा होत आहे.
श्री. प्रभाकर वखरे हे कृषी पर्यवेक्षक म्हणून बारा वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले त्यांची सेवा ठाणे कृषी आयुक्तालय अंतर्गत कल्याण तालुका व मुरबाड तालुक्यात झाली तसेच काही दिवस ते देवगड येथेही कार्यरत होते. सेवानिवृत्तीनंतर मुरबाड येथून ते गुजरात राज्यातील सुरत येथे स्थायिक झाले.
क्राईम बॉर्डर चे मुख्य संपादक राजेंद्र वखरे यांचे ते मोठे बंधू होत.
त्यांना पत्नी सौ.सरला, मुली सुरेखा, मीना, वैशाली ,कोमल, चिऊ व दिनकर ,प्रकाश अशी अपत्य असून सुनबाई सौ.सोनाली भाऊ राजेंद्र व बहिणी सौ. पार्वतीबाई ,श्रीमती उषाबाई व सौ .विमलबाई तसेच २ पुतणे ,जावई व १४ नातवंड ,लहान भाऊ राजेंद्र वखरे व त्यांच्या पत्नी सौ .सीमा असा भाला मोठा परिवार त्यांच्या पाठीशी आहे.