CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

राज्यात पशुवैद्यकीय सेवांचे सक्षमीकरण;​​​​​​​ १९६२ हेल्पलाइन आणि व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे शेतकऱ्यांना दारातच मिळणार आरोग्य सेवा

CRIME BORDER | 02 June 2026 | 02:04 PM

राज्यात पशुवैद्यकीय सेवांचे सक्षमीकरण;​​​​​​​ १९६२ हेल्पलाइन आणि व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे शेतकऱ्यांना दारातच मिळणार आरोग्य सेवा

ठाणे : - महाराष्ट्र राज्यातील पशुपालक आणि शेतकरी बांधवांना तात्काळ व गतिमान पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन आयुक्तालयाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

     पशुसंवर्धन विभाग, भारत फायनान्शियल इंक्लुजन लिमिटेड आणि इंडसइंड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात गेल्या पाच वर्षांपासून '१९६२' ही टोल-फ्री हेल्पलाइन सेवा यशस्वीपणे राबवली जात आहे. या हेल्पलाइनच्या अंतर्गत सुरू असलेल्या 'मोबाईल व्हेटर्नरी युनिट्स' म्हणजेच फिरत्या पशुवैद्यकीय वाहनांच्या माध्यमातून ग्रामीण व दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या दारातच मोफत आरोग्य सेवा पुरवली जात आहे.

            या योजनेचा फायदा घेत आतापर्यंत ८ लाखांहून अधिक जनावरांवर वेळेवर, सुलभ आणि विश्वसनीय उपचार करण्यात आले आहेत.

            या उपक्रमाला मिळालेल्या मोठ्या यशानंतर, पशुवैद्यकीय सेवा आणखी जलद आणि आधुनिक करण्यासाठी प्रशासनाने आता 'व्हॉट्सॲप-आधारित चॅटबॉट सेवा' सुरू केली आहे.

            संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना घरबसल्या रिअल-टाइम (तात्काळ) वैद्यकीय साहाय्य मिळावे आणि प्रशासनाशी थेट संवाद साधणे सोपे व्हावे, हा या डिजिटल उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. हा चॅटबॉट अतिशय सोप्या पद्धतीने डिझाइन करण्यात आला असून शेतकरी आपल्या मोबाईलवरून +९१ ९०६३१४२२९९ या क्रमांकावर व्हॉट्सॲप मेसेज पाठवून किंवा प्रशासनाचा अधिकृत क्यूआर (QR) कोड स्कॅन करून या सेवेचा लाभ घेऊ शकतात.

            या सुविधेचा वापर करणे अत्यंत सोपे आहे. शेतकऱ्यांनी नमूद केलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर केवळ "Hi" असा मेसेज पाठवल्यास त्यांना जनावरांचे आजार, उपचार आणि लसीकरणाबद्दल सविस्तर माहिती उपलब्ध होते. तसेच, विविध पशुसंवर्धन विषयक सरकारी योजनांची माहितीही याद्वारे मिळवता येते.

            या चॅटबॉटचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यावरून शेतकरी थेट पशुवैद्यकीय डॉक्टरांशी चॅट, ऑडिओ कॉल किंवा व्हिडिओ कॉल (टेलीकन्सल्टेशन) याद्वारे संपर्क साधून दूरस्थ सल्ला घेऊ शकतात. याशिवाय यामध्ये रुग्णालय व पशुवैद्यकीय सेवांची मार्गदर्शिका आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) यांचीही सोय करण्यात आली आहे.

            या नवीन डिजिटल प्रणालीला सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, ऑक्टोबर २०२५ ते मे २०२६ या कालावधीत ६१५ शेतकऱ्यांनी या चॅटबॉटचा यशस्वी वापर केला आहे, तर २०१ पशुपालकांनी व्हिडिओ कॉलद्वारे डॉक्टरांचा थेट सल्ला घेतला आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा प्रवासाचा वेळ आणि खर्च वाचणार असून, आणीबाणीच्या प्रसंगात जनावरांना तात्काळ उपचार मिळून त्यांच्या उत्पादकतेत सुधारणा होण्यास मदत होणार आहे.

            संपूर्ण महाराष्ट्रात तंत्रज्ञान-आधारित आणि सक्षम पशुवैद्यकीय यंत्रणा उभारण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सातत्याने परिश्रम घेत आहे. पशुपालकांना तातडीने वैद्यकीय सेवा पुरवण्याला विभागाने सर्वोच्च प्राथमिकता दिली असून, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी १९६२ या कॉल सेंटर सेवेचा आणि नवीन व्हॉट्सॲप चॅटबॉटचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.