CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पातलीपाडा जैवविविधता उद्यानात  २०० बांबू वृक्षांचे वृक्षारोपण

CRIME BORDER | 08 June 2026 | 12:11 PM

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पातलीपाडा जैवविविधता उद्यानात  २०० बांबू वृक्षांचे वृक्षारोपण

ठाणे  : - जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ठाणे महानगरपालिकेच्या वतीने पातलीपाडा येथील जैवविविधता उद्यान (बांबू वन) येथे सुमारे २०० बांबू रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते झाले.

यावेळी उपायुक्त मधुकर बोडके,  मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान, वरिष्ठ उद्यान अधीक्षक केदार पाटील यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी आयुक्त सौरभ राव यांनी ‘बुद्धाज बेली बांबू’ (Buddha’s Belly Bamboo) या वैशिष्ट्यपूर्ण प्रजातीचे रोप लावून वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात केली. आकर्षक खोड आणि पर्यावरणपूरक गुणधर्मांमुळे ही बांबूची प्रजाती विशेष मानली जाते. जलद वाढ, कार्बन शोषण क्षमता आणि हिरवळीच्या क्षेत्रवृद्धीत योगदान यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी तिचे महत्त्व अधोरेखित होते.

ठाणे महापालिकेने २०२६-२७ या वर्षासाठी एक लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले असून शहरातील मोकळ्या जागा, उद्याने, रस्त्यालगतचे परिसर, शासकीय संस्था आणि नागरिकांच्या सहभागातून हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या उपक्रमांतर्गत जैवविविधता उद्यानात एकूण आठ विविध प्रजातींची २०० बांबू रोपे लावण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान आयुक्तांनी महापालिकेद्वारे विकसित करण्यात आलेल्या सेंद्रिय शेती प्रकल्पालाही भेट दिली. नागरिकांसाठी खुले असलेल्या या प्रकल्पामध्ये पालेभाज्या, फळभाज्या, कंदवर्गीय पिके तसेच विविध फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. येथे उत्पादित होणाऱ्या भाज्यांचे वृक्षप्रेमी व अनाथाश्रमांना विनामूल्य वितरण करण्यात येते. तसेच नागरिकांना सेंद्रिय शेती, बीजसंवर्धन, कंपोस्ट निर्मिती आणि नैसर्गिक शेती पद्धतींबाबत मार्गदर्शनही दिले जाते.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उद्यान अधीक्षक केदार पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला.
ठाणे महानगरपालिका पर्यावरण संवर्धन, जैवविविधता संरक्षण आणि नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत  असल्याचे यावेळी सांगण्यात आले.