CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 
Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

पाचोरा-जामनेर-बोदवड-मलकापूर ब्रॉडगेज रेल्वे मार्ग प्रकल्पासंदर्भात अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

नाशिक विभागीय संपादक  : डॉ . शशिकांत काळे

CRIME BORDER | 14 June 2026 | 10:59 AM

पाचोरा-जामनेर-बोदवड-मलकापूर ब्रॉडगेज रेल्वे मार्ग प्रकल्पासंदर्भात अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

जळगाव : जिल्ह्यातील दळणवळण यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी आणि महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी अप्पर मुख्यसचिव यांच्या अध्यक्षतेखाली पाचोरा-जामनेर-बोदवड-मलकापूर ब्रॉडगेज रेल्वे मार्ग प्रकल्पासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

बैठकीतील प्रमुख प्रशासकीय बाबी व भूसंपादन आढावा : भुसंपादन प्रस्तावाला गती: मौजे जामनेर (ता. जामनेर, जि. जळगाव) येथील भूसंपादन प्रस्ताव क्र. ८२/२०२४ अंतर्गत प्रकल्पासंदर्भात तांत्रिक व कायदेशीर बाबींची सविस्तर चर्चा करण्यात आली. 

समन्वयातून गतिमानता : रेल्वे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक जमीन हस्तांतरण प्रक्रिया जलद गतीने आणि नियमांच्या चौकटीत राहून पूर्ण करण्याबाबत संबंधित विभागांना मार्गदर्शन करण्यात आले. 

उच्चस्तरीय प्रशासकीय उपस्थिती :  सदर बैठकीस मंत्रालय, मुंबई येथून अप्पर मुख्य सचिव, नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी जळगाव उपजिल्हाधिकारी (समन्वय भूसंपादन शाखा) जळगाव, उपजिल्हाधिकारी (अप्पर तापी प्रकल्प, हतनूर) जळगाव, सहाय्यक संचालक (नगर रचना) जळगाव आणि मध्य रेल्वे (निर्माण), भुसावळ विभागाचे उपमुख्य अभियंता उपस्थित होते.