CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

कोंकण विभागात पर्यटन विकासाला मोठी गती  कृषी पर्यटन, होम स्टे आणि पर्यटन निवास योजनेला लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद तब्बल ३७९ प्रमाणपत्रांचे वाटप

CRIME BORDER | 14 June 2026 | 12:34 PM

No image available

नवी मुंबई :- पर्यटन संचालनालयाच्या कोंकण भवन (नवी मुंबई) येथील विभागीय कार्यालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध महत्त्वाकांक्षी पर्यटन योजनांना कोंकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. शासनाच्या कृषी पर्यटन, होम स्टे (निवास न्याहारी), टूरिस्ट व्हिला, टूरिस्ट अपार्टमेंट आणि व्हेकेशन होम (पर्यटन निवास) यांसारख्या विविध कल्याणकारी व रोजगारभिमुख योजनांतर्गत लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज सादर करून लाभ घेतला आहे. संपूर्ण कोंकण विभागातून विविध पर्यटन उपक्रमांसाठी एकूण ४७६ अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी कागदपत्रांची पडताळणी आणि स्थळ पाहणी पूर्ण करून ३७९ यशस्वी लाभार्थ्यांना अंतिम प्रमाणपत्रे जारी करण्यात आली आहेत. अशी माहिती कोंकण विभागीय पर्यटन कार्यालयाने दिली आहे. यामध्ये सर्वाधिक वाटा कृषी पर्यटन क्षेत्राचा असून या माध्यमातून कोंकणच्या ग्रामीण भागात पर्यटनाचे एक नवे पर्व सुरू झाले आहे.

या योजनांच्या जिल्हावार आणि घटकनिहाय सविस्तर आढावा घेतला असता, 'कृषी पर्यटन' (Agro Tourism) योजनेला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. कृषी पर्यटनांतर्गत विभागात आतापर्यंत एकूण ४३३ अर्ज प्राप्त झाले होते, ज्यापैकी ४३० स्थळांची प्रत्यक्ष पाहणी (Site Visits) पूर्ण झाली असून ३३६ लाभार्थ्यांना यशस्वीरित्या प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आहेत. यामध्ये रायगड जिल्ह्याने आघाडी घेतली असून रायगडमधून सर्वाधिक १४९ अर्ज आले होते, ज्यापैकी ११३ कृषी पर्यटन केंद्रांना प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. त्याखालोखाल पालघर जिल्ह्यातून १०६ अर्जांपैकी ८० केंद्रांना, ठाणे जिल्ह्यातून ८७ अर्जांपैकी ६७ केंद्रांना, रत्नागिरी जिल्ह्यातून ५० अर्जांपैकी ४२ केंद्रांना, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ४१ अर्जांपैकी ३४ केंद्रांना मंजुरी देऊन प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. या योजनेत कागदपत्रांच्या त्रुटींमुळे व नियमांची पूर्तता न केल्यामुळे संपूर्ण विभागातून ९६ अर्ज नाकारण्यात आले आहेत, ज्यामध्ये ठाण्यातील २०, पालघरमधील २५, रायगडमधील ३६, रत्नागिरीतील ८ आणि सिंधुदुर्गातील ७ अर्जांचा समावेश आहे.

कृषी पर्यटनासोबतच पर्यटकांना स्थानिक आदरातिथ्याचा अनुभव देणाऱ्या 'होम स्टे' (Home Stay) आणि 'व्हेकेशन होम' (Vacation Home) म्हणजेच सुट्टीतील निवास व्यवस्था योजनांनाही चांगला प्रतिसाद लाभत आहे. होम स्टे योजनेअंतर्गत कोंकण विभागातून एकूण ४ अर्ज प्राप्त झाले होते आणि या सर्व ४ अर्जांची स्थळ पाहणी यशस्वीरित्या पूर्ण करून त्यांना प्रमाणपत्रे जारी करण्यात आली आहेत, ज्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २, रायगड जिल्ह्यातील १ आणि रत्नागिरी जिल्ह्यातील १ होम स्टे धारकाचा समावेश आहे. याशिवाय वैयक्तिक आणि कौटुंबिक पर्यटनासाठी हक्काचे ठिकाण ठरत असलेल्या 'व्हेकेशन होम' योजनेअंतर्गत विभागातून एकूण २५ अर्ज दाखल झाले होते. या सर्व २५ अर्जांची पाहणी करून सर्वांना प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत; यामध्ये रायगड जिल्ह्यात सर्वाधिक १३, पालघर जिल्ह्यात ८, ठाणे जिल्ह्यात २ आणि रत्नागिरी जिल्ह्यात १ व्हेकेशन होमचा समावेश असून सिंधुदुर्गात यामध्ये सध्या निरंक नोंद आहे.

तसेच, उच्च दर्जाच्या निवास सुविधा पुरवणाऱ्या 'टूरिस्ट व्हिला' (Tourist Villa) आणि 'टूरिस्ट अपार्टमेंट' (Tourist Apartment) या पर्यटन घटकांमध्येही उद्योजकांनी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. टूरिस्ट व्हिला योजनेसाठी एकूण १० अर्ज प्राप्त झाले होते आणि या सर्व १० अर्जदारांची जागेवर पाहणी करून त्यांना प्रमाणपत्रे बहाल करण्यात आली आहेत. यात रायगड जिल्ह्यातील ५, पालघर जिल्ह्यातील ३ आणि ठाणे जिल्ह्यातील २ पर्यटन व्हिलांचा समावेश आहे. दुसरीकडे, 'टूरिस्ट अपार्टमेंट' योजनेअंतर्गत एकूण ४ अर्ज प्राप्त झाले होते, ज्यामध्ये ठाणे जिल्ह्यातून २, पालघरमधून १ आणि रायगडमधून १ अर्जदाराचा समावेश होता. याही चारही अर्जांची प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करून ४ प्रमाणपत्रे जारी करण्यात आली आहेत. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातून या तिन्ही निवास श्रेणींमध्ये सध्या एकही अर्ज नोंदवला गेलेला नाही.

कोंकण विभागीय कार्यालयामार्फत जाहीर करण्यात आलेल्या या अधिकृत आकडेवारीवरून स्पष्ट होते की, निसर्गसंपन्न कोंकण किनारपट्टीवर पर्यटनाच्या माध्यमातून शाश्वत रोजगार निर्माण करण्यात या योजना अत्यंत प्रभावी ठरत आहेत. शासनाच्या 'आई' (पर्यटन धोरणांतर्गत महिला सक्षमीकरण) व इतर पोषक धोरणांमुळे स्थानिक स्तरावर शेतकरी, महिला आणि तरुण उद्योजकांना मोठा आर्थिक आधार मिळत असून, यामुळे कोंकणच्या पर्यटन क्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होत आहे.

पर्यटन संचालनालयाच्या कोंकण भवन (नवी मुंबई) कार्यालयामार्फत पर्यटनाविषयीच्या योजनांची मंजुरी प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि पारदर्शक करण्यात आली आहे. त्यामुळे कोंकण विभागातील स्थानिक शेतकरी, महिला बचत गट, तरुण आणि नवउद्योजकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. आपल्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना व्यवसायाचे रूप देण्यासाठी आणि कोंकणच्या पर्यटन विकासात आपले योगदान देण्यासाठी पर्यटन विभागाच्या https://maharashtratourism.gov.in/mr/home/  या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन किंवा पर्यटन संचालनालय  विभागीय पर्यटन कार्यालय, रूम नंबर 721 सातवा मजला कोकण भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई. दू.क्र. 022-27560002 या कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या उपक्रमाची नोंदणी करावी, असे आवाहन पर्यटन संचालनालय कोंकण विभागाच्या उपसंचालक डॉ. प्रज्ञा मनोहर यांनी केले आहे.

******


--