CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

उपायुक्तांपेक्षा ठाणे महापालिकेत अभियंते झाले बडे ! आदेश झुगारुन उद्यानात ट्रन्सफोर्मर बसविण्याची दिली परवानगी उद्यानात बागडणाऱ्या मुलांच्या जीवाशी खेळ

विक्रांत चव्हाण यांचा उपोषणाचा इशारा

CRIME BORDER | 19 June 2026 | 06:36 PM

No image available

ठाणे - उद्यानात लहान मुले खेळत असतात, तर वयोवृध्द नागरिक फेरफटका मारत असतात, या कारणांमुळे वर्तकनगर येथील उद्यानात ट्रन्सफोर्मर बसविण्यास नकार देणाऱ्या उपायुक्तांच्या आदेशाला अभियंत्यांनी केराची टोपली दाखवत एमएसईबीला परवानगी दिली आहे. यामुळे येथील रहिवासी संतप्त असून काँग्रसचे माजी अध्यक्ष आणि माजी स्थानिक नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी `काम थांबवा' अन्यथा २३ जून रोजी पालिका मुख्यालयावर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.


वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत भीमनगर येथील बिल्डिंग नं. ५४ च्या पाठीमागे ठाणे महापालिका निगा व देखभाल करत असलेले म्हाडाचे उद्यान आहे. एमएसईबीने या उद्यानात ट्रन्सफोर्मर बसविण्याची विनंती केल्यानंतर म्हाडाने ठाणे मनपाकडे `ना हरकत पत्र' मिळविण्यासाठी पत्रव्यवहार सुरु केला होता. उद्यानाच्या जागेत असलेले मंदिर तसेच प्रवेशद्वाराकरीता जागा उपलब्ध नसलयाने आणि ट्रन्सफोर्मर मधून स्पार्क किंवा शार्ट सर्किट सारखी दुर्घटना घडल्यास लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, या कारणांमुळे उपायुक्तांनी ना हरकत प्रमाण पत्र देऊ नये असे स्पष्ट केले होते, अशी माहिती विक्रांत चव्हाण यांनी दिली आहे.


उपायुक्तांचे आदेश धाब्यावर बसवत बांधकाम खात्याचे किरण भोये, संदीप गायकवाड, रणधीर राणे, सुधीर गायकवाड, शहर विकास विभागाचे रविशंकर शिंदे यांनी परस्पर ना हरकत प्रमाणपत्र देण्याबरोबरच उद्यानही म्हाडाकडे वर्ग करण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे. लहान मुलांच्या जीवशी खेळणाऱ्या  या अधिकाऱ्यांचा विक्रांत चव्हाण यांनी निषेध केला असून या अधिकाऱ्यांच्या निलंबासाठी व ट्रन्सफोर्मर बसवू नये या मागण्यांसाठी २३ जून पासून पालिका मुख्यालयावर आमरण उपोषण करण्याचा इशारा विक्रांत चव्हाण यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्राद्वारे दिला आहे.