CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

अनोळखी मयताची ओळख पटवण्याचे मानपाडा पोलीसांचे आवाहन

CRIME BORDER | 22 June 2026 | 01:47 PM

अनोळखी मयताची ओळख पटवण्याचे मानपाडा पोलीसांचे आवाहन

डोंबिवली :- दिनांक १०  जून २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजता शास्त्रीनगर पोलीस ठाण्यात मयत झालेल्या अनोळखी इसमाची ओळख पटवण्याचे आवाहन मानपाडा पोलीसांनी केले आहे. 

यासंदर्भात मानपाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर व कलम 130/ 2026 सी .आर .पी ‌.सी .कलम 194 प्रमाणे दाखल करण्यात आली आहे. 

दिनांक १० जून २०२६ रोजी खबर देणार पोलीस नाईक राजेंद्र अशोक आव्हाड नेमणूक मानपाडा पोलीस ठाणे ,डोंबिवली पोलीस स्टेशन डोंबिवली यांनी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मानपाडा पोलीस ठाणे अंमलदार यांनी कळविले की खोणी पोलीस पाटील यांचा फोन आला व त्यांनी कळविले की गणेश पाटील राहणार खोणीगाव यांचे बंगल्यासमोर एक इसम बेशुद्ध अवस्थेत पडलेला आहे.

त्यानंतर मानपाडा पोलीस पथक सदर घटनास्थळी गेले असता एक इसम वय  अंदाजे 55 वर्षे अंगावर काळ्या रंगाचे शर्ट व राखाडी रंगाचे पॅन्ट असलेला इसम मिळून आला.

त्यास पुढील दवा उपचार करणे कामी खोणी ग्रामपंचायत यांच्या ॲम्ब्युलन्सने शास्त्रीनगर हॉस्पिटल डोंबिवली पश्चिम येथे घेऊन गेले असता तेथील डॉक्टरांनी त्यास तपासून दाखल दिनांक १० जून २०२६ रोजी साडेआठ दाखल पूर्व मयत घोषित केले असून अनोळखी मयताचे मरणाबाबत कोणाविरुद्ध काही तक्रार नाही म्हणून खबर नोंदविण्यात आली आहे तरी यातील मयत  इसमाचे नातेवाईक व मयताचे नाव मानपाडा पोलीस ठाणे घेत आहे ‌.

मयताचे वर्णन मिशी वाढलेली ,काळी व पांढरी अंगात नेसूस काळ्या रंगाचा शर्ट, तपकिरी रंगाची पॅन्ट ,उजव्या हातामध्ये लोखंडी कडे व लाल धागा बांधलेला अशा वर्णनाच्या इसम मयत आहे.

बांधा मध्यम , उंची ५.६ फूट ,रंग सावळा ,चेहरा उभट, नाक सरळ, अंगावरील खुण व निशाणी पोटावर ऑपरेशन झालेले निशान , केस डोक्याचे काळे पांढरे. 

तरी या संदर्भात कोणास काही माहिती असल्यास संबंधितांनी मानपाडा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक एकनाथ पाऊलबुद्धे मानपाडा पोलीस ठाणे डोंबिवली पूर्व मोबा .नं.९८६०३४८६१० वर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानपाडा, डोंबिवली पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे