CRIME BORDER | 03 July 2026 | 11:39 AM
डोंबिवली :- रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्स (क्लब आयडी २२२२४८) यांच्या वतीने रोटरी वर्ष २०२६-२७ निमित्त "सक्षम" या शैक्षणिक उपक्रमांतर्गत श्री. रा. साठे माध्यमिक विद्यालय, डोंबिवली (पूर्व) येथे इयत्ता दहावी अ आणि ब तुकडीतील विद्यार्थ्यांना 'स्टडी बडी' अॅपचे मोफत वाटप करण्यात आले.
छत्रपती शिक्षण मंडळ, कल्याण संचलित या शाळेत झालेल्या या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग तसेच रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते. या अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दहावीच्या अभ्यासक्रमासाठी उपयुक्त डिजिटल शैक्षणिक साहित्य मोफत उपलब्ध होणार असून, याचा गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी मोठा फायदा होणार आहे.
क्लबचे अध्यक्ष रोटेरियन उज्वल ठोंबरे, प्रकल्प अध्यक्ष रोटेरियन प्रशांत दामले आणि सचिव रोटेरियन शैलेश गोर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या राबवण्यात आला. या कार्यक्रमास रोटेरियन नीलेश सोनवणे, रोटेरियन राजेश भावे आणि रोटेरियन हितेश देवलिया हे सदस्यही उपस्थित राहून त्यांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगदान दिले. "प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचावे, हाच 'सक्षम' उपक्रमाचा मूळ उद्देश आहे," असे क्लबतर्फे सांगण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्सतर्फे भविष्यातही अशा विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांद्वारे विद्यार्थी व समाजासाठी कार्य सुरू ठेवण्यात येणार आहे.