CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

जेव्हा प्रत्येक वेळी जवळ येणं फक्त गरज म्हणून उरतं आणि त्यातली सहजता हरवते ...

- नमिता दोंदे ( डोंबिवली )

CRIME BORDER | 06 July 2026 | 05:34 PM

जेव्हा प्रत्येक वेळी जवळ येणं फक्त गरज म्हणून उरतं आणि त्यातली सहजता हरवते ...

सहज होणारी कृती जेव्हा गरज होऊन जाते...?? खरंतर नवरा बायको मधील अतिशय हळवा आणि नाजूक विषय आहे. एक वेळ पुरुष तरी आपल्या मित्रांकडे व्यक्त होतं असतील. किंवा संवाद तरी करत असतील पण महिला यांना हे विषय इतक्या मोकळेपणाने बोलता येतं असेल? आज एका स्त्रीच मनं उलगडताना बोलता बोलता तिचा एक नाजूक कोपरा मला गवसला म्हणून हे व्यक्त करते...
आमचं खूप प्रेम आहे.आम्हा दोघांनाही ते जाणवतं राहतं... अनेक प्रसंगातून, शब्दातून... आमचा संसार खूप आनंदी आणि छान सुरूय... सगळ्या गोष्टी, जबाबदारी आम्ही अतिशय नीट पार पाडतोय...पण वयाच्या 35 नंतर एक गोष्ट बदलतेय पण ती इतकी महत्वाची आहे का? माहित नाही... अग बोल की, असं मी म्हंटल्यावर तिने दबक्या आवाजात मला सांगितलं, आमच्यात शारीरिक जवळकी होण्यासाठी एक ते दीड महिन्याचा कालावधी होतो आणि ते फार जुळवून मग होतं... मला ते जुळवून आणून याचा त्रास होतोय.. कारण मग पुन्हा जेव्हा शारीरिला जाणीव होईल तेव्हा पुन्हा मोठ्या गॅप नंतर जवळ येणं... मला फार टेक्निकल वाटायला लागलं आहे... ती बोलतं होती.. खाली मान घालून बोलतं होती.. तिला माझ्याकडे हे व्यक्त होतानाही अपराधी वाटतं असावं...
मी तिच्याकडे बघून इतकंच म्हंटल तुझं उत्तर तुझ्याकडे आहे... आपण यावर बोलू... खास "तिच्यासाठी " लिहलेलं हे आर्टिकलं...
कित्येक जोडप्यान मध्ये प्रेम आहेच 
पण कधी कधी प्रेम व्यक्त करण्याची सहजता हरवते असं वाटतं नाही का?
म्हणजे बघा हा, लग्नाच्या सुरुवातीला आपण कसे होतो एकमेकांसाठी... एकाच घरात राहूनही एकमेकांना खास ( डेट वर ) भेटण्यासाठी निमित्तं शोधावी लागत नव्हती, गिफ्ट देण्यासाठी खास दिवस लागतं नव्हता,एक नजर, एक स्पर्श, एक हसू ... एवढंच पुरेसं असायचं . प्रेमाला वेळ ठरवावा लागतं नव्हता . तो अगदी सहज कृतीत होता... एकमेकांच्या जवळ येणं ही गरज नसतेच ; ती स्वाभाविक ओढ असते.आणि हि ओढ नात्याला अधिकाधिक फुलवत होती...मग त्या वेलीवर एक फुल उमल.. मग आयुष्य हळूहळू बदलतं गेलं...
संसार सुरू होतो... जबाबदाऱ्या वाढतात... लहान घरात प्रत्येक क्षण कुणाच्या ना कुणाच्या उपस्थितीत जातो... ऑफिसचा ताण, घरची कामं, आर्थिक चिंता, थकवा आणि वाढत जाणारं वय...या सगळ्यात दोन माणसं एकमेकांवरचं प्रेम विसरत नाहीत, पण ते व्यक्त करण्याची सहजता मात्र नकळत मागे पडते.दिवसभर धावपळ करून रात्री बिछान्यावर पडल्यावर प्रेमापेक्षा झोप जास्त जवळची वाटते.
दिवस जातात... आठवडे निघून जातात... कधी कधी महिनेही.
आणि मग अचानक दोघांनाही जाणवतं...आपण किती दिवस एकमेकांसाठी थांबलोच नाही.मग कॅलेंडर पाहिलं जातं. वेळ जुळवली जाते. मुलं कधी झोपतील याचा विचार होतो. उद्याची सुट्टी आहे का, हे पाहिलं जातं.
आणि प्रेम...
नकळत नियोजनाचा भाग बनतं.
ही गरज चुकीची नाही.
उलट तीही नात्याचा नैसर्गिक भाग आहे.
पण जेव्हा प्रत्येक जवळ येणं फक्त गरज म्हणून उरतं आणि त्यातली सहजता हरवते, तेव्हा नातं थोडंसं यांत्रिक वाटायला लागतं.
प्रेम म्हणजे फक्त एकमेकांच्या जवळ जाणं नाही.
प्रेम म्हणजे स्वयंपाकघरात उभं राहून नकळत खांद्याला खांदा लागणं... काम करता करता एक कप चहा समोर ठेवणं... घाईत निघताना केसांवरून अलगद हात फिरवणं... रात्री झोपताना हातात हात घेऊन दोन मिनिटं शांत पडून राहणं... कारण नसताना "आज तू खूप छान दिसतेस" किंवा "आज तू खूप दमला असशील" असं म्हणणं.
हे छोटे क्षणच नात्यातली सहजता जिवंत ठेवतात.
शारीरिक जवळीक ही प्रेमाचा शेवट नसते; ती त्या दिवसभर जपलेल्या भावनिक जवळकीचं सुंदर विस्तारलेलं रूप असतं. मला तुझा अधिक वेळ हवाय असं एकमेकांना बोलता यायला हवं... आपण जवळ आल्यावर तुझा श्वास, तूझी धडधड शांतपणे ऐकायची आहे. फक्त काही मिनिटाचं सुख नकोय.. रमायचंय तुझ्यात... रुजवायचा आहे तुझा प्रत्येक श्वास माझ्या श्वासात... तुझ्या हृदयाची धडधड खूप वेळ ऐकायची आहे. नात्याला मोठ्या सहलींची, महागड्या भेटवस्तूंची किंवा खास दिवसांची नेहमीच गरज नसते.
गरज असते ती...
एकमेकांना एकांतातही वेळ देण्याची...
एकमेकांकडे पुन्हा नव्याने पाहण्याची.
आणि स्वतःला आठवण करून देण्याची...
आपण फक्त आई-बाबा नाही...
फक्त जबाबदाऱ्या पेलणारे दोन माणसं नाही...
आपण अजूनही प्रेमात असलेले नवरा-बायको आहोत.
कारण नातं फक्त गरजांवर टिकत नाही...
ते टिकतं त्या छोट्या छोट्या सहज क्षणांवर, जे कोणत्याही कॅलेंडरवर लिहिलेले नसतात... पण आयुष्यभर मनात जपलेले असतात...