CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील (ACB), रत्नागिरी यांना भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून ‘उत्कृष्ट सेवा सन्मान’

मा.ना. उदय सामंत - उच्च व तंत्र शिक्षण या विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री यांच्या हस्ते ‘उत्कृष्ट सेवा सन्मान’ प्रदान

CRIME BORDER | 15 August 2026 | 02:57 PM

पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील (ACB), रत्नागिरी यांना भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून ‘उत्कृष्ट सेवा सन्मान’

रत्नागिरी :- कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा, निष्ठा आणि जनसेवेची भावना जपत उल्लेखनीय कार्य करणारे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), रत्नागिरी यांना भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून ‘उत्कृष्ट सेवा सन्मान’ प्रदान करण्यात आला .

त्यांच्या उत्कृष्ट व उल्लेखनीय सेवाकार्याची दखल घेत मिळालेल्या या सन्मानामुळे पोलीस दलासह रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

मा.ना. उदय सामंत - उच्च व तंत्र शिक्षण या विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री यांच्या हस्ते ‘उत्कृष्ट सेवा सन्मान’ प्रदान करण्यात आला 

           पोलीस सेवेत कार्यरत असताना अविनाश पाटील यांनी कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य देत प्रामाणिकपणा, शिस्त, धाडसी निर्णयक्षमता आणि जनहिताची बांधिलकी जपली. कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करताना नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेण्यात आली आहे.

            भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून मिळालेला हा सन्मान म्हणजे त्यांच्या सेवाभावी कार्याची राष्ट्रीय पातळीवर झालेली पोचपावती मानली जात आहे. या गौरवामुळे त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये आणि पोलीस दलात आनंदाचे वातावरण आहे.

           कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळख निर्माण केलेल्या अविनाश पाटील यांच्या या सन्मानाबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील सेवावाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त होत आहेत.

          ‘कर्तव्य, सेवा आणि सुरक्षा’ हीच ओळख जपत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अविनाश पाटील यांचा राष्ट्रीय स्तरावरील हा सन्मान निश्चितच अभिमानास्पद ठरला आहे.