CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल' प्रणालीद्वारे ठाणे जिल्ह्यात घरबसल्या खत खरेदी सुलभ जिल्हाधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

CRIME BORDER | 20 August 2026 | 11:34 AM

No image available

ठाणे :-  ठाणे जिल्ह्यामध्ये खत खरेदी आणि विक्रीसाठी 'फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल' (Framework for Fertilizer Sale) ही नवीन प्रणाली लागू करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना आता मोबाईलमधील ॲप्लिकेशनच्या माध्यमातून घरबसल्या, स्वतःच्या आवश्यकतेनुसार आणि जवळील खत विक्री केंद्रातून युरिया व डीएपी यांसारख्या अनुदानित खतांची खरेदी करता येणार आहे. शेतकऱ्यांना खतांची उपलब्धता, ऑनलाईन बुकिंग आणि वितरण प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक व शेतकरी हिताची व्हावी, यासाठी हे ॲप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे.

नोंदणी प्रक्रिया आणि प्रशिक्षण शेतकऱ्यांना ॲग्रिस्टॅक आयडी (Agristack ID) किंवा आधार प्रमाणीकरणाच्या (आधार बेस) माध्यमातून या ॲप्लिकेशनवर नोंदणी करता येणार आहे. ठाणे जिल्ह्यात ही प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा कार्यरत आहे. सद्यस्थितीत जिल्हास्तरीय मास्टर ट्रेनरच्या माध्यमातून क्षेत्रिय स्तरावरील सर्व अधिकारी, कर्मचारी व कृषी निविष्ठा विक्रेते यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, याद्वारे क्षेत्रिय स्तरावर प्रचार-प्रसिद्धि सुरू आहे. क्यूआर कोडच्या (QR Code) माध्यमातून विकसित करण्यात आलेली ही नवीन प्रणाली शेतकऱ्यांना समजावून सांगितली जात आहे.

 जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन जमिनीच्या सुपीकता निर्देशांकानुसार आवश्यक असणारी खत मात्रा ऑनलाईन बुक करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी नवीन ॲप डाऊनलोड करून त्याची कार्यपद्धती समजून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ (भा.प्र.से.) यांनी केले आहे.

खत खरेदीसाठी 'फ्रेमवर्क फॉर फर्टीलायझर सेल' ॲपची कार्यपद्धती:

1.       लॉगिन करा: 'फ्रेमवर्क फॉर फर्टीलायझर सेल' ॲप गुगल प्ले-स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. मोबाईलमध्ये ॲप उघडून राज्य (State) निवडा. आधार क्रमांक किंवा ॲग्रिस्टॅक आयडी प्रविष्ट करा आणि प्राप्त ओटीपी (OTP) टाकून पडताळणी पूर्ण करा.

2.      जमिनीची नोंदणी करा:

अ) ॲग्रिस्टॅक आयडीद्वारे लॉगिन केल्यास जमिनीची माहिती आपोआप उपलब्ध होईल.

ब) आधार क्रमांकाद्वारे लॉगिन केल्यास जमीन स्वतःची, भाडेकरू अथवा संयुक्त मालकीची असल्यास योग्य पर्याय निवडा. जिल्हा, तालुका, गाव आणि सर्व्हे/गट क्रमांक भरून 'Fetch Land' वर क्लिक करा.

3.      पीक निवडा: लागवड केलेल्या पिकांची माहिती तपासून सत्याप्रित करा.

4.      खतासाठी अर्ज करा: शासनाच्या GFR (General Fertilizer Recommendation) नुसार शिफारस केलेल्या खतांची यादी व प्रमाण दिसेल. आवश्यकतेनुसार खत निवडा.

5.      खताचे प्रमाण निश्चित करा: आवश्यक गोण्यांची संख्या निवडा. एका अर्जामध्ये एकापेक्षा अधिक प्रकारची खते निवडता येतील.

6.      विक्रेता निवडा: जवळील उपलब्ध खत विक्रेत्यांची यादी दिसेल. उपलब्ध साठा आणि अंतर पाहून योग्य विक्रेता निवडा.

7.      खत घेणारी व्यक्ती निवडा: खत स्वतः घेणार असल्यास 'स्वतः' हा पर्याय निवडा. प्रतिनिधीमार्फत घेणार असल्यास त्याची माहिती भरा. यासाठी आधार व मोबाईल क्रमांक पडताळणी आवश्यक आहे.

8.      QR टोकन प्राप्त करा: अर्ज यशस्वीरित्या सादर झाल्यानंतर QR Code व टोकन क्रमांक तयार होईल. हा QR Code सुरक्षित जतन करून ठेवा.

9.       खत प्राप्त करा: निवडलेल्या विक्रेत्याकडे जाऊन QR Code दाखवा. विक्रेता कोड स्कॅन करून अर्ज व प्रमाण तपासेल. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर खत व पावती प्राप्त करा.

महत्त्वाच्या सूचना:

•        शेतकऱ्यांकडे ॲग्रिस्टॅक आयडी असणे आणि आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे.

•        जमिनीची माहिती अद्ययावत असावी.

•        GFR नुसार शिफारस केलेले खत तपासून घ्यावे.

•        QR Code सुरक्षित जतन करावा; चुकीची माहिती भरल्यास अर्ज विलंबित होऊ शकतो.

•        खत खरेदी केवळ नोंदणीकृत विक्रेत्याकडूनच करावी.

तक्रार निवारण:

अर्ज किंवा खत वितरणासंदर्भात कोणतीही अडचण आल्यास, संबंधित तालुका कृषी अधिकारी, गुण नियंत्रण निरीक्षक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा पंचायत समिती (जिल्हा परिषद) यांच्याशी संपर्क साधावा. प्राप्त तक्रारीची पडताळणी करून पात्र प्रकरणांवर तात्काळ कार्यवाही करण्यात येईल.