CRIME BORDER | 25 August 2026 | 05:45 PM
क्राईम बॉर्डर च्या सर्व पदाधिकारी व प्रतिनिधींसाठी अंतिम सूचना !
३१ ऑगस्ट २०२६ पूर्वी ऑनलाइन सदस्य नोंदणी अनिवार्य
अधिकृत सूचना : क्राईम बॉर्डरच्या प्रिंट मीडिया व न्यूज वेब पोर्टलशी संबंधित सर्व सदस्य, पत्रकार, वार्ताहर, तालुका प्रतिनिधी, जिल्हा प्रतिनिधी, विभागीय प्रतिनिधी, विभागीय संपादक तसेच राज्य प्रतिनिधी यांना सूचित करण्यात येते की, त्यांनी ३१ ऑगस्ट २०२६ पूर्वी www.crimeborder.com या अधिकृत वेब पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने आपली सदस्य नोंदणी पूर्ण करावी.
निर्धारित मुदतीत ऑनलाइन सदस्य नोंदणी न करणाऱ्या पदाधिकारी, सदस्य व प्रतिनिधींचे सदस्यत्व रद्द करण्यात येईल. तसेच संबंधित व्यक्तींच्या नावाने अथवा त्यांच्या प्रतिनिधित्वाखाली क्राईम बॉर्डरच्या वेबसाईटवर प्रकाशित असलेल्या बातम्या, फोटो व इतर माहिती हटविण्याची कार्यवाही करण्यात येईल. त्यानंतर संबंधित व्यक्तीचा क्राईम बॉर्डरशी कोणत्याही प्रकारचा अधिकृत संबंध राहणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
अनाधिकृतपणे क्राईम बॉर्डर चे जुने ओळखपत्र व लोगो वापरू नये तसेच आपल्या टू व्हीलर, फोर व्हीलरवर त्याचा वापर करू नये तसे आढळल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधितावर असेल व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
ज्यांचे ओळखपत्र हरवले असेल त्यांनी त्यांच्या विभागातील पोलीस स्टेशनला जाऊन तसा अर्ज देऊन ओळखपत्र हरवण्याचे सर्टिफिकेट अर्थात प्रमाणपत्र क्राईम बॉर्डरच्या कार्यालयात सादर करावे.
सर्वांनी ही सूचना गांभीर्याने घेऊन दिलेल्या मुदतीपूर्वी आपली ऑनलाइन सदस्य नोंदणी पूर्ण करावी.
संपादिका सौ. सीमा राजेंद्र वखरे
क्राईम बॉर्डर : प्रिंट मीडिया व न्यूज वेब पोर्टल