CRIME BORDER | 26 December | 12:52 PM
अभिनंदन !
कालच दहावीचा रिझल्ट लागला. जे पास झाले ज्यांना चांगले मार्क्स मिळाले त्यांचे अभिनंदन, पण जे नापास झाले त्यांना माझे सांगणे आहे की, नापास झालात म्हणजे आभाळ कोसळले नाही. अजून आपल्याला संधी आहे. आपण कुठे कमी पडलो हे शोधा.
अभ्यास म्हणजे कंटाळा, अभ्यास म्हणजे वैताग, हे डोक्यातून काढून टाका. "अभ्यास पण एंजॉय करता येतो" हे सोपे तत्व पाळा आणि पुढच्या तयारीला लागा.
यापुढे 'परिक्षा जवळ आली की मग अभ्यास' ही संकल्पना बदला. जर आधीपासून अभ्यास केलात तर
परिक्षेचे टेंशन येतच नाही. आयुष्यातून 'ऑप्शन' ही संकल्पना काढून टाका. काहीच ऑप्शनला टाकायचे नाही.
जे आपल्याला येत आहे ते तर येणारच पण जे येतं नाही ते आधी शिकून घ्या.
आणि मी तुम्हाला लेक्चर देतोय असं अजिबात समजू नका. मीही तुमच्या सारखाच होतो. म्हणून अनुभवाचे बोल मांडत आहे, आणि हो पडलेला चेहरा घेऊन घरात नाटक करू नका. आपण कमी पडलो, चुकलो, हे मान्य करा. घरच्यांची माफी मागा, कारण आपण त्यांचे श्रम त्यांचा पैसा वाया घालवला आहे आणि इतरांसमोर त्यांना मान खाली घालायला लावली आहे.
असो! काही बिघडत नाही, पुन्हा लढायला सज्ज व्हा आणि पुढच्या तयारीला म्हणजेच अभ्यासाला लागा.
-तुमच्यापैकीच एक
- दीपक कांबळी