CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

वरणगावच्या सामाजिक, राजकीय आणि कुस्ती परंपरेतील ‘कैलास दादा’ हरपले!

नामवंत व्यक्तिमत्त्व कैलास बाबुराव मराठे यांचे निधन; जुन्या आठवणींना उजाळा देताना जेष्ठ पत्रकार राजेंद्र वखरे झाले भावुक

CRIME BORDER | 31 August 2026 | 11:09 AM

वरणगावच्या सामाजिक, राजकीय आणि कुस्ती परंपरेतील ‘कैलास दादा’ हरपले!

“जुन्या आठवणींचा ठेवा मागे ठेवून कैलास दादा अनंताच्या प्रवासाला”

“धावण्याची जिद्द, माणुसकीची नाळ अन् राजकीय निष्ठा... कैलास दादा मराठे यांची आठवण कायम!”

मुंबई (प्रतिनिधी) : वरणगाव शहर आणि परिसरातील सामाजिक, राजकीय तसेच कुस्ती क्षेत्राशी घट्ट नाते असलेले सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व कैलास बाबुराव मराठे यांचे निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे. त्यांच्या निधनाने मराठे कुटुंबीयांसह वरणगाव परिसरावर शोककळा पसरली आहे.

मराठे कुटुंब हे वरणगावमधील जुने आणि प्रतिष्ठित कुटुंब म्हणून ओळखले जाते. पैलवान कुटुंब म्हणून त्यांची विशेष ओळख असून, गोरगरीब व गरजूंच्या मदतीला धावून जाणे तसेच प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होणे हा या कुटुंबाचा स्वभाव राहिला आहे.

कैलास दादा मराठे यांच्यासोबत माझ्या तरुणपणातील तसेच शिक्षणाच्या काळातील काही काळ घालवण्याचे भाग्य मला लाभले. भारतीय जनता पक्षाचे खंदे समर्थक असलेल्या कैलास दादांच्या आठवणी आजही मनात ताज्या आहेत. त्यांचे बंधू आणि माझे राजकीय गुरू आदरणीय रमेश दादा मराठे यांच्याकडूनही मला अनेक गोष्टी शिकता आल्या.

कैलास दादा जेव्हा बेटावद बुद्रुक ता.जामनेर येथे यायचे, तेव्हा त्यांच्या सहवासात राहण्याची संधी मला मिळायची. त्यांचा दिनक्रम ठरलेला असायचा. ते नियमित रनिंग , व्यायाम करायचे आणि मलाही सोबत रनिंगला (न्यू इंग्लिश स्कूलच्या रस्त्याने बेटावद  बुद्रुक रोडवर) घेऊन जायचे. 

त्याचबरोबर दररोज रात्री साडेआठ वाजताच्या हिंदी बातम्या ग्रामपंचायतीच्या टीव्हीवर पाहणे (मला सोबत घेऊन) हा त्यांचा आवडता दिनक्रम होता. या साध्या-सोप्या आठवणी आज त्यांच्या निधनानंतर मनाला अधिकच चटका लावून जात आहेत.

कालांतराने प्रकृतीने त्यांना साथ दिली नाही :- काही वर्षांपूर्वी ते व काकू डोंबिवली येथे माझ्याकडे आले होते. त्यानंतर मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही. आणि काल त्यांच्या निधनाची बातमी समजली... क्षणभर मन सुन्न झाले आणि जुन्या आठवणींचा पट डोळ्यांसमोर उभा राहिला.

कैलास दादा यांच्या जाण्याने एक जिव्हाळ्याचा माणूस, आपुलकीचा सहकारी आणि कुटुंबातील आधार हरपल्याची भावना मनात आहे.

मराठे कुटुंबीय तसेच काकू, बहिणी, पुतणे, पुतण्या  आत्या आणि सर्व आप्तस्वकीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती श्री स्वामी समर्थांनी द्यावी आणि कैलास दादांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी, हीच श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना.

भावपूर्ण श्रद्धांजली!