CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

“जुळले हृदयांचे ऋणानुबंध; यूपीएससी पालकांकडून वखरे कुटुंबाचा हृदयस्पर्शी सन्मान!”

कु. शिवम वखरेच्या ६५१ व्या रँकचे कौतुक; पेढे भरवून अभिनंदन करत पालकांनी दिल्या भावी वाटचालीस शुभेच्छा

CRIME BORDER | 31 August 2026 | 12:46 PM

“जुळले हृदयांचे ऋणानुबंध; यूपीएससी पालकांकडून वखरे कुटुंबाचा हृदयस्पर्शी सन्मान!”

मुंबई | दि. ३० ऑगस्ट २०२६ :- यूपीएससीची परीक्षा पाल्य देतात; मात्र त्यामागची खरी परीक्षा पालकांचीही असते! तीन-चार वर्षांपूर्वी यूपीएससीच्या तयारीत असलेल्या पाल्यांच्या पालकांना एकत्र आणणारा छोटासा समूह आज एक घट्ट, जिव्हाळ्याचे आणि रक्ताच्या नात्यापेक्षाही जवळचे नाते बनला आहे. दादर येथील राजा शिवाजी विद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये रविवारी झालेल्या स्नेहमेळाव्यात याच नात्याचा अनोखा प्रत्यय आला आणि वखरे कुटुंबासाठी हा क्षण अविस्मरणीय ठरला.

श्री.मिलिंद नेवे सर आणि श्री..नवनाथ जगताप सर यांच्या पुढाकारातून गेल्या तीन-चार वर्षांत यूपीएससी देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा हा समूह तयार झाला. सुरुवातीला केवळ परीक्षेच्या निमित्ताने एकत्र आलेले पालक कधी एकमेकांच्या सुख-दुःखाचे साथीदार बनले, हे काळाच्या ओघात त्यांनाही कळले नाही.

यूपीएससीमध्ये एखाद्या पाल्याने यश मिळविले की त्याचा आनंद संपूर्ण समूहाचा; कुणाला प्रेरणा देण्याची वेळ आली की सर्वजण पुढे; स्वागत असो, सत्कार असो किंवा यशाचे कौतुक—प्रत्येक उपक्रमात या पालकांचा उत्स्फूर्त सहभाग राहिला. वर्षागणिक पालकांची संख्या वाढत गेली आणि त्यातून आपुलकीचे एक नवे कुटुंबच निर्माण झाले.

कु. शिवमच्या यशाने वखरे कुटुंबाचा आनंद द्विगुणित

ज्येष्ठ पत्रकार श्री. राजेंद्र श्रावण वखरे यांच्या कुटुंबासाठी रविवारीचा दिवस विशेष ठरला. त्यांचा सुपुत्र कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे याने सन २०२५ मध्ये यूपीएससी परीक्षेत ६५१वा क्रमांक मिळवून यश संपादन केले. तसेच मुलाखतीत महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळविल्याचे नमूद करण्यात आले.

कु.शिवमच्या या यशाची दखल घेत उपस्थित यूपीएससी पालकांनी श्री. राजेंद्र वखरे यांना पेढे भरवून अभिनंदन केले, तर कु. शिवमला त्याच्या भावी प्रशासकीय कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

हा सन्मान पाहून श्री. वखरे भावूक झाले. “या पालकांनी माझ्या कुटुंबावर केलेले प्रेम शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. कार्यक्रम छोटेखानी असला तरी त्यातून मिळालेला आनंद अमूल्य आहे. काल तर माझ्या पोटात आनंद मावेना,” अशा भावनिक शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

एका घरचे यश… संपूर्ण समूहाचा जल्लोष!

विशेष म्हणजे केवळ  कु. शिवमच नव्हे, तर इतर पालकांच्या पाल्यांनी विविध क्षेत्रांत मिळविलेल्या यशाचाही यावेळी गौरव करण्यात आला. यशस्वी पाल्यांच्या पालकांचें  पेढे भरवून स्वागत करण्यात आले. प्रत्येकाच्या यशात सहभागी होताना पालकांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हा या समूहाच्या एकजुटीची साक्ष देत होता.

यूपीएससीसारख्या कठीण आणि प्रदीर्घ प्रवासात पाल्यांच्या बरोबरीने पालकही मानसिक आणि भावनिक संघर्षातून जातात. अशा वेळी एकमेकांना धीर देणारा, अनुभव सांगणारा, यशाचा आनंद वाटून घेणारा आणि अपयशाच्या काळात खंबीरपणे उभा राहणारा हा पालक समूह आज एका कुटुंबाचे रूप धारण करत आहे.

यावेळी श्री.मिलिंद नेवे , श्री.जालिंदर खरात , श्री.नवनाथ जगताप  ,श्री.नवनाथ चौधरी ,डाॅ.मिलिंद राणे ,श्री.सुनील साळवे, श्री. संजय धनावडे सातारा, श्री.अंबादास खेडकर ,श्री अंकुश नाळे ,पुणे,श्री .दिपक घरटे, छ.संभाजीनगर हे पालक व आदी उपस्थित होते .

“वखरे कुटुंबाकडून यूपीएससी पालकांचे मनःपूर्वक आभार!”

रक्ताचे नाते नसतानाही रक्ताच्या नात्याइतकी माया देणाऱ्या या सर्व यूपीएससी पालकांचे वखरे कुटुंबाने मनःपूर्वक आभार मानले आहेत. कु. शिवमच्या यशाच्या निमित्ताने मिळालेला हा प्रेमाचा वर्षाव वखरे कुटुंबासाठी कायमस्वरूपी स्मरणात राहणारा ठरला आहे.

- क्राईम बॉर्डर

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणारे प्रिंट मीडिया व न्यूज वेब पोर्टल

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे | संपादिका : सौ. सीमा राजेंद्र वखरे

www.crimeborder.com