CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

९८.८० टक्क्यांची झेप... सोनाक्षीला स्कुटीची भेट! गुणवंत विद्यार्थ्यांवर बक्षिसांचा वर्षाव

मनसे नेते बाळा नांदगावकर, गणेश चुककल व समीर वानखेडे यांच्या उपस्थितीत गुणवंतांचा दिमाखदार सन्मान

CRIME BORDER | 02 September 2026 | 11:07 AM

९८.८० टक्क्यांची झेप... सोनाक्षीला स्कुटीची भेट! गुणवंत विद्यार्थ्यांवर बक्षिसांचा वर्षाव

मुंबई (जे. के. सुरवाडे) :- दहावीच्या बोर्ड परीक्षेत बुद्धिमत्ता, जिद्द आणि अथक मेहनतीच्या जोरावर घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सलाम करण्यात आला. घाटकोपर पश्चिम, मुंबई येथे ३० ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सत्कार समारंभात गुणवंत विद्यार्थ्यांचा दिमाखदार सन्मान करण्यात आला.

दहावीच्या बोर्ड परीक्षेत तब्बल ९८.८० टक्के गुण मिळवून विभागात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या कुमारी सोनाक्षी राजेश कांबळे हिच्या उल्लेखनीय यशाची विशेष दखल घेण्यात आली. तीच्या कर्तृत्वाचा गौरव म्हणून मनसे नेते गणेश चुककल यांच्या हस्ते सोनाक्षी कांबळे ला  स्कुटी बक्षीस देण्यात आली . या सन्मानामुळे सोनाक्षीच्या यशाला विशेष झळाळी मिळाली.

यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर आणि समीर वानखेडे (आय आर एस ) यांनी सोनाक्षी कांबळेच्या यशाचे विशेष कौतुक करून  उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सोनाक्षीच्या नेत्रदीपक यशामुळे कार्यक्रमस्थळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

गुणवंत विद्यार्थ्यांवर बक्षिसांचा वर्षाव

याच कार्यक्रमात दहावीच्या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना लॅपटॉप, तर इतर विद्यार्थ्यांना स्कूल बॅग्स व विविध शैक्षणिक स्वरूपाची आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणाऱ्या या अनोख्या उपक्रमाचे उपस्थित पालक, विद्यार्थी व मान्यवरांनी विशेष स्वागत केले.

कार्यक्रमाला मनसे नेते बाळा नांदगावकर, गणेश चुककल आणि समीर वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक करत, भविष्यातही अशाच प्रकारे उल्लेखनीय कामगिरी करून देशाच्या व समाजाच्या प्रगतीत योगदान देण्याचे आवाहन केले.

गणेश चुककल यांच्या संकल्पनेतून प्रेरणादायी उपक्रम

गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याच्या उद्देशाने मनसे नेते गणेश चुककल यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला केवळ कौतुकाची थाप न देता त्यांच्या पुढील शिक्षणासाठी प्रत्यक्ष मदतीचा हात देणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

“गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू आणि त्यांच्या स्वप्नांना बळ देऊ,” या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.

दरम्यान, आगामी काळात आणखी मोठ्या संख्येने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना यापेक्षाही मोठी व उपयुक्त शैक्षणिक बक्षिसे देण्यात येतील, असे आश्वासन मनसे नेते गणेश चुककल यांनी यावेळी दिले.

गुणवंत विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान, त्यांच्या स्वप्नांना मिळालेले बळ आणि शिक्षणाला प्रोत्साहन देणारा घाटकोपरमधील हा सोहळा विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला.

www.crimeborder.com क्राईम बॉर्डर न्यूज वेब पोर्टल