CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

ठाणे जिल्हा मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) सुरू

सुनावणी टप्पा, आवश्यक कागदपत्रे आणि सुधारित वेळापत्रक जाहीर

CRIME BORDER | 02 September 2026 | 11:58 AM

ठाणे जिल्हा मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) सुरू

ठाणे :- भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार दि. ०१ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) राबविण्यात येत आहे. 

            या मोहिमेअंतर्गत ज्या मतदारांचे तपशील जुन्या डेटाबेसशी जुळत नाहीत, त्यांच्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी (ERO) स्तरावर सुनावणी व नोटीस टप्पा राबवला जात आहे, या संदर्भातील आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक संपन्न झाली. यावेळी या प्रतिनिधींना विविध प्रकारच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, तहसिलदार प्रदीप कुडाळ यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांत एकूण ७४ लाख ५० हजार ५१५ मतदारांपैकी ४५ लाख ९० हजार २४९ (६१.६१%) मतदारांचे सर्वेक्षण फॉर्म्स (EFS) डिजिटाईज करण्यात आले आहेत. उर्वरित २८ लाख ६० हजार २६६ (३८.३९%) नोंदींमध्ये स्थलांतरित (७.३५ लाख), मयत (२.२२ लाख) आणि अनुपलब्ध/शोध न लागलेले (१७.०८ लाख) यांचा समावेश आहे. तसेच जिल्ह्यातील ६ हजार ८९४ मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करून आता ६ हजार ८३१ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या प्रक्रियेत राजकीय पक्षांच्या १७ हजार ६७० बूथ लेव्हल एजंट्सचाही (BLA) सहभाग आहे.

सुनावणी / नोटीस टप्पा:..  

            कोणाला आणि कोणते पुरावे द्यावे लागणार?

            ज्या नागरिकांनी Enumeration फॉर्ममध्ये भरलेली माहिती मागील २००२ च्या SIR मतदार यादीत उपलब्ध नाही अथवा डेटाबेसशी जुळत नाही, अशा मतदारांना मतदार नोंदणी अधिकाऱ्यांमार्फत (ERO) अधिकृत सुनावणी नोटीस दिली जात आहे. नोटीस मिळाल्यानंतर मतदारांनी वयोमर्यादेनुसार खालीलप्रमाणे पुरावे सादर करणे आवश्यक आहे:

 ०१ जुलै १९८७ पूर्वी भारतात जन्म झालेले नागरिक :

स्वतःची जन्मतारीख आणि/किंवा जन्मस्थळ सिद्ध करणारा शासनमान्य यादीतील कोणताही एक दस्तऐवज.

 ०१ जुलै १९८७ ते ०२ डिसेंबर २००४ दरम्यान भारतात जन्म झालेले नागरिक :

            १. स्वतःची जन्मतारीख आणि/किंवा जन्मस्थळ सिद्ध करणारा कोणताही एक दस्तऐवज.

            २. आई किंवा वडील यांच्यापैकी कोणाही एकाची जन्मतारीख आणि/किंवा जन्मस्थळ सिद्ध करणारा एक दस्तऐवज.

            घोषणापत्रासोबत ग्राह्य धरली जाणारी १२ अधिकृत कागदपत्रे सुनावणीदरम्यान मतदार नोंदणीसाठी खालील १२ पैकी वैध कागदपत्रे सादर करता येतील :

            केंद्र शासन / राज्य शासन / सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU) यांच्या नियमित कर्मचारी किंवा निवृत्तीवेतनधारकांचे ओळखपत्र / पेन्शन पेमेंट आदेश (PPO).

            दि. ०१.०७.१९८७ पूर्वी भारतात शासन / स्थानिक प्राधिकरण / बँक / पोस्ट ऑफिस / LIC / PSU यांनी जारी केलेले कोणतेही ओळखपत्र, प्रमाणपत्र किंवा दस्तऐवज.

            सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला अधिकृत जन्म दाखला (Birth Certificate).

            पासपोर्ट (Passport).

            मान्यताप्राप्त मंडळ किंवा विद्यापीठाचे माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) / शैक्षणिक प्रमाणपत्र.

            सक्षम राज्य प्राधिकाऱ्याने दिलेले कायम निवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate).

            वनहक्क प्रमाणपत्र.

            सक्षम प्राधिकाऱ्याने जारी केलेले OBC / SC / ST किंवा इतर जात प्रमाणपत्र.

            राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC - जेथे लागू असेल तेथे).

            राज्य किंवा स्थानिक प्राधिकाऱ्यांनी तयार केलेली अधिकृत कुटुंब नोंदवही.

            शासनाने जारी केलेले जमीन किंवा घर वाटप प्रमाणपत्र.

            आधार कार्ड (भारत निवडणूक आयोगाच्या पत्र क्र. २३/२०२५-ERS/Vol.II दिनांक ०९.०९.२०२५ मधील विहित सूचनांनुसार).

सुधारित SIR वेळापत्रक (महत्त्वाच्या तारखा)...

            प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी : ३१ ऑगस्ट २०२६

            दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी : ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६

            नोटीस टप्पा व दावे-हरकतींची सुनावणी/निकालाची मुदत : ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर २०२६

            अंतिम मतदार यादी प्रसिद्धी : ०४ नोव्हेंबर २०२६

            सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीतील आपल्या नावाची खात्री करून घ्यावी आणि आवश्यक असल्यास वेळेत संबंधित कागदपत्रांसह सुनावणी प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडून करण्यात आले आहे.