CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

रेखाटलेले एक चित्र... आणि आठवणींनी भरलेला एक अविस्मरणीय क्षण!..

२८ वर्षांची मैत्री, संघर्षाच्या आठवणी आणि कु. शिवमच्या यशाचा अभिमानाचा क्षण...

CRIME BORDER | 02 September 2026 | 02:33 PM

रेखाटलेले एक चित्र... आणि आठवणींनी भरलेला एक अविस्मरणीय क्षण!..
रेखाटलेले एक चित्र... आणि आठवणींनी भरलेला एक अविस्मरणीय क्षण!..

मुंबईसारख्या महानगरीत नोकरीच्या शोधात असताना एका शाळेत शिक्षक म्हणून एकत्र काम करण्याचा योग आला आणि त्यातून माझी व क्रीडा शिक्षक व ज्येष्ठ पत्रकार श्री. राजेंद्र वखरे सरांची मैत्रीची सुरुवात झाली. पाहता पाहता या मैत्रीला तब्बल २८ वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटला; मात्र काळ बदलला, परिस्थिती बदलली, जीवनाची वाटचाल वेगवेगळ्या दिशेने झाली, तरी आमच्या मैत्रीतील जिव्हाळा, आपुलकी आणि स्नेह आजही तितकाच अबाधित आहे.

या प्रदीर्घ मैत्रीच्या प्रवासात राजेंद्र वखरे सरांचा संघर्ष, विद्यार्थ्यांप्रती असलेली तळमळ आणि आपल्या कुटुंबासाठी त्यांनी घेतलेले अथक परिश्रम मी जवळून पाहिले आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण, संस्कार आणि मोठी स्वप्ने पाहण्याचे बळ दिले.

आज त्यांचा सुपुत्र कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे याने देशातील अत्यंत प्रतिष्ठेची UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करून मिळविलेले यश पाहताना मनापासून आनंद आणि अभिमान वाटतो.

कु. शिवमच्या या यशामागे त्याची बुद्धिमत्ता, मेहनत आणि जिद्द आहेच; पण त्याचबरोबर आई-वडिलांचे संस्कार, त्याग, प्रोत्साहन आणि अविरत पाठबळ यांचेही मोलाचे योगदान आहे.एका सामान्य कुटुंबातील मुलाने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर एवढे मोठे यश संपादन करणे ही निश्चितच अभिमानाची बाब आहे.

मैत्रीचा धागा २८ वर्षांनंतरही तितकाच घट्ट...

कु. शिवमच्या या उल्लेखनीय यशाचे कौतुक करण्यासाठी मला आणि माझे परममित्र, व्याख्याते, कलाशिक्षक व नाटककार श्री. आनंद मेहेर सर यांना डोंबिवली येथील वखरे सरांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट देण्याचा योग आला.

२८ वर्षांच्या मैत्रीतील हा प्रसंग आमच्यासाठी विशेष भावनिक होता. इतक्या वर्षांनंतरही मैत्रीचा तोच जिव्हाळा, तोच स्नेह आणि एकमेकांच्या आनंदात सहभागी होण्याची तीच भावना मनात होती. मित्राच्या मुलाने मिळविलेल्या यशाचा आनंद स्वतःच्या मुलाच्या यशाइतकाच वाटणे, हेच कदाचित खऱ्या मैत्रीचे सौंदर्य असावे!

रेखाटलेले एक चित्र... आणि त्यामागच्या असंख्य भावना!

कु. शिवमला लहानपणापासूनच चित्रकलेची विशेष आवड असल्याचे कळल्याने त्याच्यासाठी काहीतरी मनापासून द्यावे, अशी इच्छा होती. म्हणून त्याच्या या विशेष यशाची आठवण कायमस्वरूपी जपली जावी, या भावनेतून त्याचे स्केच पोर्ट्रेट साकारून त्याला भेट दिले.

ते पोर्ट्रेट कु. शिवमच्या हातात देतानाचा क्षण माझ्यासाठी अत्यंत भावनिक होता.

ते केवळ कागदावर रेखाटलेले चित्र नव्हते...

त्या प्रत्येक रेषेत २८ वर्षांच्या मैत्रीच्या आठवणी होत्या,

प्रत्येक छटेत वखरे कुटुंबाच्या संघर्षाची जाणीव होती,

प्रत्येक रेषेत आई-वडिलांच्या त्यागाला सलाम होता,आणि त्या चित्राच्या प्रत्येक कोपऱ्यात कु. शिवमच्या उज्ज्वल भवितव्याची मनःपूर्वक शुभेच्छा होती.

कधी कधी कलाकाराच्या हातातील पेन्सिल केवळ चेहरा रेखाटत नाही, तर माणसांमधील नाती, आठवणी आणि भावनाही कागदावर उतरवते. आज कु. शिवमचे पोर्ट्रेट साकारताना असाच एक अविस्मरणीय अनुभव आला.

काही स्वप्ने कागदावर रेखाटली जातात; तर काही स्वप्ने आयुष्याच्या कॅनव्हासवर साकार होतात... कु. शिवमने आपल्या कर्तृत्वाने आपल्या आयुष्याचे एक सुंदर आणि प्रेरणादायी चित्र रेखाटले आहे!

कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा. कु. शिवमच्या हातून देशसेवेचे उत्तुंग कार्य घडो आणि त्यांच्या कर्तृत्वाने वखरे कुटुंबाचा गौरव अधिकाधिक उंचावत राहो, हीच मनःपूर्वक सदिच्छा!

कलाशिक्षक : श्री. सुधाकर भामरे ,कल्याण