CRIME BORDER | 20 September 2026 | 10:41 AM
बुलढाणा प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालय पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोताळा तालुका शालेय कबड्डी स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेमध्ये सिंदखेड येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाचा १४ वर्षे वयोगटातील मुलांचा संघ विजयी ठरला आहे.
सरस्वती विद्यालय डिडोळा येथील मैदानावर झालेल्या तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांमध्ये 14 वर्षे वयोगटातील छत्रपती शिवाजी विद्यालय सिंदखेड येथील मुलांचा संघ सर्वेश जाधव (कर्णधार ) श्रीकांत साळुंखे, हर्षल कृपाळ, आदित्य सूर्यवंशी, सार्थक मुंडाळे, निखिलेश कुणबीथोप, कार्तिक चौके,ओम भुसारी, भावेश मोरे,ओम मेहंगे सहभागी झाला होता. या संघाने सहकार विद्या मंदिर धामणगाव बढे, सरस्वती विद्यालय डिडोळा, एम .ई .एस. हायस्कूल धामणगाव बढे, बाल शिवाजी विद्यालय धामणगाव बढे या संघाचा पराभव करून अंतिम विजयी स्थान पटकावले. जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी या संघाची निवड झाली असून मोताळा तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी या संघाला मिळाली आहे. संघाचे प्रशिक्षक आर. एन. आरमाळ हे होते.
संस्थाध्यक्ष योगेंद्र गोडे, मुख्याध्यापक सर्जेराव देशमुख यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले आहे.