CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

श्रीमती जरिंना टी.तडवी मॅडम अनपेक्षितपणे तुम्ही का हो गेलात ?

CRIME BORDER | 26 December 2025 | 06:22 PM

श्रीमती जरिंना टी.तडवी मॅडम अनपेक्षितपणे तुम्ही का हो गेलात ?

पत्र पेटी - वाचकांचे मनोगत  राजेंद्र वखरे: डोंबिवलीहून लिहतात 

श्रीमती जरिंना तुराब तडवी (मॅडम) परवा परवाच मी माझा शालेय मित्र सुभाष ढगे याच्या कडून गावातील माहिती घेत असतांना तुमच्याबद्दल समजले, तुमच्यावर भुसावळ येथे उपचार सुरु होते.त्यानंतर तुम्हाला श्री.संजय (दादा)गरुड यांच्या सहकार्याने तात्काळ सिव्हिल मध्ये हलवण्यात आलं असल्याचं मला समजलं‌.आम्हाला वाटले होते की, तुम्ही लवकरच बरे होऊन घरी याल व आमच्या गावातील कच्च्या बच्च्यांना पुन्हा शिकवाल परंतु आज  तुम्ही गेल्याची बातमी येऊन धडकली आणि काळजात धस्स झालं.

 

जरिंना तडवी(मॅडम)ताई तुमचं असं अचानक जाण्याचं वय नव्हतं हो! तुम्ही तुमच्या कुटुंबाला व आमच्या गावाला पोरकं करून गेलात तुमच्या सारख्या प्रतिभासंपन्न शिक्षक वृद्धांची आम्हाला खूप गरज आहे हो!.आमचं तसं खेडं गाव पण न्यू इंग्लिश स्कूल व प्राथमिक विद्या मंदिराने अनेक मोठ मोठी माणसं घडवली,आणि तो वारसा तुम्ही शिक्षक वृंद अव्याहतपणे चालवत आहात.तुम्ही अचानक सोडून गेलात ? तुमच्या या अनपेक्षित जाण्यानं शिक्षण क्षेत्रातील पोकळी भरून येण्यासारखी नाही .आपण शिक्षण क्षेत्रात केलेले योगदान खूप मोठं आहे.तुम्ही गेल्या १० वर्षांपासून आमच्या शाळेत विद्यादानाचं कार्य करीत होतात.

 

तुमचं सासर यावल तालुक्यातील तर माहेर भुसावळ.आपले वडील रेल्वे पोलीसात  पोलीस.उप.निरीक्षक (रिटायर्ड) होते.गेल्या चार महिन्यापूर्वीच हार्टअटॅक ने ते गेले.अन काही दिवसापूर्वीच आईचंही निधन झालं.आणि तुम्ही आजारी पडलात तुमच्या मिस्टरांनी खूप  प्रयत्न केले . पण तुमची प्राणज्योत मालवली.  

 

न्यू इंग्लिश स्कूल,स्कूल बेटावद बु।। चे मुख्याध्यापक आर.एस.ब्राह्मणे म्हणाले कि,आम्ही संयमशील व विद्यार्थीप्रिय शिक्षिका गमावली आहे.त्या प्रत्येक उपक्रमात हिरीरीने भाग घेत असत.  

 

तुमच्या आत्म्यास चिरशांती लाभो व आपल्या कुटुंबावर आणि न्यू इंग्लिश स्कूल परिवारा, बेटावद बु!!व गावावर कोसळलेले दुःख पचवण्याची श्री स्वामी समर्थ महाराज शक्ती देवो हिच त्यांच्या त्यांच्या  चरणी प्रार्थना. क्राईम बॉर्डर, परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली 

 

राजेंद्र वखरे, डोंबिवली-  मोबा.९६१९६३००३५