CRIME BORDER | 20 September 2026 | 12:09 PM
डोंबिवली :- विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल दुकानाचे शटर उचकटून चोरी करणाऱ्या तीन आरोपींना पोलीसांनी अटक करून घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. आरोपींकडून चोरीस गेलेले एकूण नऊ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
विष्णूनगर पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र. 246/2026, भारतीय न्याय संहिता कलम 331(4), 305(a), 3(5) अन्वये दि. 17 सप्टेंबर 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
संबंधित दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी दुकानातील सुमारे 30 हजार रुपये किमतीचे नऊ मोबाईल फोन व चार्जर तसेच 6,500 रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल चोरी केला होता.गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा माग काढत पोलीसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले.
पोलीसांनी आरोपींकडून चोरीस गेलेले एकूण नऊ मोबाईल फोन जप्त केले आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची आधारवाडी कारागृह, कल्याण पश्चिम येथे रवानगी करण्यात आली आहे.