CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

भरती परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित व उमेदवाराभिमुख करण्यासाठी कोकण विभागातील विद्यार्थी, उमेदवार, शैक्षणिक संस्था व तज्ज्ञांनी सूचना पाठवाव्यात-विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल

CRIME BORDER | 20 September 2026 | 03:30 PM

No image available

नवी मुंबई, : राज्यातील भरती परीक्षा पद्धतीच्या विविध बाबींचा सर्वंकष अभ्यास करून त्यात आवश्यक सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली १२ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या बैठकीत भरती परीक्षा पद्धतीचे संपूर्ण पुनर्विलोकन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (सेवा) श्रीमती व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून, कोकण विभागातील विद्यार्थी, उमेदवार, शैक्षणिक संस्था, तज्ज्ञ तसेच भरती परीक्षा प्रक्रियेशी संबंधित घटकांनी आपले अनुभव व रचनात्मक सूचना समितीपर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी केले आहे.

भरती परीक्षा प्रक्रियेत प्रश्नपत्रिका तयार करणे व त्यांची सुरक्षित हाताळणी, परीक्षा केंद्रांचे व्यवस्थापन, परीक्षेची सुरक्षितता व विश्वासार्हता, आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर, विविध यंत्रणांमधील समन्वय, उमेदवारांशी संवाद व तक्रार निवारण तसेच परीक्षा प्रक्रिया अधिक सुलभ व उमेदवाराभिमुख करण्याच्या दृष्टीने विविध बाबींचा समितीमार्फत अभ्यास करण्यात येत आहे.

या अभ्यासाचा महत्त्वाचा भाग म्हणून राज्यातील महसूल विभागांमध्ये प्रत्यक्ष सल्लामसलत आयोजित करण्यात येत आहे. कोकण विभागासाठी सल्लामसलत २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत चेतना कॉलेज, जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्या कार्यालयाजवळ, चेतना महाविद्यालय मार्ग, वांद्रे (पूर्व), मुंबई-५१ येथे आयोजित करण्यात आली आहे. या सल्लामसलतीमध्ये विद्यार्थी व स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, शैक्षणिक संस्था, परीक्षा प्रक्रियेशी संबंधित यंत्रणा, विषयतज्ज्ञ तसेच इतर संबंधित घटकांना आपले अनुभव, अपेक्षा आणि सूचना प्रत्यक्ष मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

समितीच्या भेटीसाठी वेळ मागू इच्छिणाऱ्या तसेच लेखी निवेदन, सूचना किंवा अभिप्राय सादर करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी दि. १५ ते २३ सप्टेंबर २०२६ दरम्यान आपले निवेदन अथवा वेळ मागणारे पत्र प्रत्यक्ष किंवा ई-मेलद्वारे सादर करावे. प्रत्यक्ष निवेदन अपर जिल्हा उपजिल्हाधिकारी यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत, ९ वा मजला, शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१ येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० या वेळेत सादर करता येईल. तसेच konkan-examreformstaskforce@maharashtra.gov.in या ई-मेलवरही सूचना, अभिप्राय किंवा भेटीसाठी वेळ मागणारे पत्र पाठविता येईल.

भरती परीक्षा पद्धतीचा अभ्यास अधिक व्यापक व सर्वसमावेशक करण्यासाठी कोकण विभागातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, तज्ज्ञ व नागरिकांनी या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा. प्रत्यक्ष अनुभव आणि रचनात्मक सूचनांच्या माध्यमातून भरती परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यास निश्चितच मदत होईल, असे आवाहन विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी केले आहे.