CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

कावळे (विक्रमगड) येथे 'नालसा मेगा ड्राईव्ह'चा शुभारंभ जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा स्तुत्य उपक्रम

CRIME BORDER | 23 September 2026 | 09:29 AM

कावळे (विक्रमगड) येथे 'नालसा मेगा ड्राईव्ह'चा शुभारंभ  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा स्तुत्य उपक्रम

ठाणे :- मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. आर. डी. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रमगड तालुक्यातील कावळे गावात दिनांक २५ ऑगस्ट २०२६ रोजी 'नालसा मेगा ड्राईव्ह'चे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मा. श्री. रविंद्र एस. पाजणकर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (नालसा), नवी दिल्ली यांच्या वतीने गावा-खेड्यांपासून शहरांपर्यंत विविध कल्याणकारी योजनांचा प्रसार व प्रचार करून त्यांचे अनुकरण करण्याबाबतचा राष्ट्रीय स्तरावर कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या गावांची निवड करून, दोन महिन्यांच्या कालावधीत विशेष जनजागृती कार्यक्रम राबविणे आणि लोकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचवून त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्याचे निर्देश जिल्हा विधी सेवा प्राधिकरणास प्राप्त झाले आहेत. याच अनुषंगाने विक्रमगड तालुक्यातील कावळे गावाची निवड करण्यात आली असून, दि. 25 ऑगस्ट 2026 रोजी या मेगा ड्राईव्हचा दिमाखात शुभारंभ करण्यात आला.

नालसाच्या प्रमुख योजना :
या मोहिमेदरम्यान राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या खालील महत्त्वाच्या योजनांचा प्रचार व प्रसार केला जाणार आहे :

·         नालसा (सर्वांगीण समावेशन, ज्ञान व शालेय शिक्षणासाठी मदत व प्रवेश) शिक्षण (SHIKSHA) योजना, 2026.

·         अदृश्य, गाळापडलेल्या व प्रभावित व्यक्तींच्या क्षमता आणि जिद्दीला पाठबळ देणारी 'स्पृहा' (SPRUHA) योजना, 2025.

·         मानव-वन्यजीव संघर्षातील पीडितांना न्यायप्रवेशासाठीची (HWC) योजना, 2025.

·         वीर परिवार सहाय्यता योजना, 2025.

·         अमली पदार्थाविषयी जनजागृती व निरोगी जीवनासाठी मार्गदर्शनाद्वारे अमली पदार्थमुक्त भारतासाठीची 'डॉन' (DAWN) योजना, 2025.

·         वंचित व असुरक्षित आदिवासी, तसेच विमुक्त व भटक्या जमातींना न्यायप्रवेश सुलभ व सक्षम करण्यासाठीची 'संवाद' (SAMVAD) योजना, 2025.

·         बालकांसाठी बालस्नेही विधी सेवा योजना, 2024.

·         मानसिक आजार असलेल्या व्यक्ती आणि बौद्धिक दिव्यांग व्यक्तींना विधी सेवा उपलब्ध करून देणारी योजना, 2024.

·         ज्येष्ठ नागरिकांसाठी विधी सेवा योजना, 2016.

·         ॲसिड हल्ल्यातील पीडितांना विधी सेवा उपलब्ध करून देणारी योजना, 2016.

·         मानवी तस्करी आणि व्यावसायिक लैंगिक शोषणाच्या पीडितांसाठी विधी सेवा योजना, 2015.

·         अससंघटित क्षेत्रातील कामगारांना विधी सेवा उपलब्ध करून देणारी योजना, 2015.

·         गरिबी निर्मूलनासाठीच्या शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणारी योजना, 2015.

प्रभातफेरी व जनजागृती अभियान :
दिनांक 2 सप्टेंबर 2026 रोजी शासकीय आश्रमशाळा, कावळे गाव यांच्या सहकार्याने गावात जनजागृती प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. "तळागाळातील जनता अज्ञानामुळे न्यायापासून वंचित राहू नये आणि शासनाच्या विविध योजनांचा त्यांना लाभ घेता यावा, यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून कावळे गावात दोन महिने योजनांची माहिती दिली जाईल तसेच जनतेस प्रत्यक्ष लाभ मिळवून दिला जाईल," असे आवाहन यावेळी श्री. रविंद्र एस. पाजणकर यांनी केले. गावकऱ्यांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.

या प्रभातफेरीदरम्यान पालघरचे अपर पोलीस निरीक्ष विनायक नरळे, विक्रमगडचे तहसीलदार मयुर चव्हाण, विक्रमगडचे सपोनि  अजित गोळे, पंचायत समिती विक्रमगडचे श्याम तुकाराम पाकलवाड, पं.स. विक्रमगडचे विस्तार अधिकारी अप्पाराव डाढाळे, वाडा वकील संघाचे सचिव ॲड. अविनाश साळवे, ग्रुप ग्रामपंचायत उटावलीच्या सरपंच पुनम गणेश म्हरकर, वाडा वकील संघाचे सदस्य, तालुका विधी सेवा समिती (वाडा) चे पॅनल विधीज्ञ, 'वी द पिपल' सामाजिक संस्थेचे ॲड. प्रशांत अभंग, शासकीय आश्रमशाळा कावळे गावचे सर्व शिक्षकवृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणेचे सचिव रविंद्र एस. पाजणकर यांनी दिली आहे.