CRIME BORDER | 23 September 2026 | 10:13 AM
डोंबिवली :- दिनांक २२ सप्टेंबर वार मंगळवार वेळ रात्री साडेआठ ठिकाण डोंबिवली मानपाडा रोड डी मार्ट च्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असणारे अनधिकृत रिक्षा स्टॅन्ड आणि येथे रिक्षा लावून धंदा करणारे मस्तवाल रिक्षा चालक रोड रोमिओ सारखा पोशाख परिधान करून काही धटिंगन रिक्षा चालक प्रवाशांकडून अवास्तव भाडे वसूल करून लूटमार करीत आहेत.यांच्या दादागिरीने प्रवासी बेजार झाले आहे.
माझ्याबरोबर घडलेला प्रसंग डी मार्ट ते 90 फ़ीट कांचनगाव ठाकुर्ली येथे प्रवासी भाडे मागील काही महिन्यापासून दीडशे(१५०) रुपये भाडे आकारले जाते. तेही नियमाला धरून नाही.तरी ते देण्यात येते पण आज चक्क १८० रुपये अतिरिक्त ३० रुपये ज्यादा भाड्याची मागणी करण्यात आली मी त्यांना हे नियमाने धरून नाही आपण एवढे जास्त भाडे कसे आकारू शकतात विचारले असता एवढेच भाडे द्यावे लागेल जायचे असेल तर जा असे उद्धट भाषेत उत्तर देण्यात आले.आणि तेथील सर्व रिक्षा चालकांना सूचना करण्यात आली कोणीही १८० रुपया खाली 90 फ़ीट ला जायचे नाही. यावर मी प्रश्न विचारले असता त्यांनी रिक्षा चालकांची टोळी तयार केली मोठ्या आवाजात बोलण्यास सुरुवात करून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला व आपल्या युनियनच्या नेत्याला फोन लावायला सुरुवात केली आणि लावलाहीबहुतांश रिक्षा युनियनचे नेते हे राजकीय पक्षाचे नेते असून रिक्षा चालकांचा कैवार घेतात पण आपल्या युनियनचा सदस्य रिक्षा चालकांना वाहतुकीचे नियम पाळा,बेकायदा रिक्षा स्टॅन्ड ला रिक्षा उभ्या करू नका,प्रवाशांकडून दाम दुप्पट भाडे वसूल करू नका,ग्राहकांची सुट्ट्या पैशावरून वाद करू नका, भाडे नाकारू नका,असे काही सांगत नाहीत कुठल्याही युनियनचे प्रथम कर्तव्य हे कामगारांचा रोजगार टिकवणे हे असते. रिक्षाचालकांचा रोजगार प्रवाशांवर अवलंबून आहे.मात्र बहुतांश रिक्षाचालक हे ग्राहकांशी असभ्यवर्तन करतात हाच सार्वत्रिक अनुभव आहे.
डी मार्ट येथील रिक्षाचालकांची इतकी दादागिरी आहे की एखादा ओला,उबर चालक ग्राहकाला घेण्याकरिता डी मार्ट परिसरात आला तर त्याला सारे रिक्षा चालक एकत्र होऊन दमदाटी व वेळप्रसंगी मारहाण करतात.
अर्थात रिक्षा युनियन केवळ गैरवर्तन करतात असे नाही काही रिक्षा युनियन सामाजिक बांधिलकी जपतात दहावी-बारावीच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत रिक्षा प्रवास शारीरिकदृष्ट्या विकलांग नागरिकांना मोफत रिक्षा सुविधा यांसह प्रवाशांचे मौल्यवान चीज,वस्तू तातडीने परत करणे अशी काही घटनांमध्ये काही युनियन पदाधिकारी व रिक्षा चालक यांची सकारात्मक भूमिका ही दिसली आहे.
पण यामुळे प्रवाशांना येणारा उर्मट अनुभवाचे समर्थन करता येणे अशक्य आहे.
मी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याण (आर.टी.ओ.)आणि ठाणे शहर वाहतूक शाखा तसेच वाहतूक नियंत्रण उपशाखा कोळशेवाडी यांना नम्र विनंती करत आहे की डी मार्ट येथील मुजोर रिक्षा चालकांवर योग्य ती कारवाई तात्काळ करावी व हतबल प्रवाशांना न्याय मिळवून द्यावा धन्यवाद!
आपला
विशाल वि. शेटे
संस्थापक अध्यक्ष सेफ्टी वेल्फेअर असोसिएशन (एन.जी.ओ.) डोंबिवली