CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनरतर्फे थॅलेसेमिया जनजागृती

CRIME BORDER | 24 September 2026 | 11:48 AM

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनरतर्फे थॅलेसेमिया जनजागृती

डोंबिवली :- रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनरतर्फे २२ सप्टेंबर २०२६ रोजी थॅलेसेमिया जनजागृती सत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रोटरी सदस्य, त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार उपस्थित होते.

याप्रसंगी प्रमुख वक्ते डॉ. माधव बैतुले (डिस्ट्रिक्ट चेअरमन, ‘एंड थॅल नाऊ’) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी स्पष्ट केले की, थॅलेसेमिया हा एक गंभीर अनुवांशिक रक्तविकार असून रुग्णांना नियमित रक्तसंक्रमणावर अवलंबून राहावे लागते. परंतु, वेळेवर रक्त तपासणी करून हा आजार सहज टाळता येऊ शकतो, म्हणूनच याविषयी प्राथमिक तपासणी आणि व्यापक जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे.

सामाजिक बांधिलकी जपत, थॅलेसेमियाग्रस्त बालकांच्या जीवनरक्षक रक्तसंक्रमणासाठी (Blood Transfusions) आणि वैद्यकीय उपचारांसाठी क्लबतर्फे 'रोटरी आश्रय ईटीएन डे केअर सेंटर'ला महत्त्वपूर्ण देणगी देण्यात आली. उपस्थितांच्या सकारात्मक प्रतिसादात हे सत्र अत्यंत उत्साहात संपन्न झाले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्सचे प्रेसिडेंट उज्वल ठोंबरे व सेक्रेटरी शैलेश गोर व सदस्यांनी परिश्रम घेतले.