CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

मानपाडा पोलीसांकडून अनोळखी मयताची ओळख पटविण्याचे आवाहन

द्वारली गावातील रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत आढळला होता इसम; उपचारापूर्वीच मृत्यू

CRIME BORDER | 30 September 2026 | 02:09 PM

मानपाडा पोलीसांकडून अनोळखी मयताची ओळख पटविण्याचे आवाहन

डोंबिवली :- द्वारली गाव परिसरातील प्रज्ञा विद्यालय, नमस्कार ढाबा येथील रस्त्याच्या कडेला एक अनोळखी इसम बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला उपचारासाठी डोंबिवली पश्चिम येथील शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता, डॉक्टरांनी त्याला तपासून १ सप्टेंबर २०२६ रोजी दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. या अनोळखी मयताची अद्याप ओळख पटलेली नसून, मानपाडा पोलीसांनी नागरिकांना ओळख पटविण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे शहर नियंत्रण कक्षाकडून मानपाडा पोलीसांना द्वारली गावातील प्रज्ञा विद्यालय, नमस्कार ढाबा परिसरातील रस्त्याच्या कडेला एक अनोळखी इसम बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच मानपाडा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.पोलीसांना घटनास्थळी अंदाजे ३३ वर्षे वयाचा पुरुष बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याच्या अंगावर शर्ट नसून केवळ हाफ राखाडी रंगाची पॅन्ट होती. त्याला पुढील वैद्यकीय उपचारासाठी खासगी ॲम्बुलन्सच्या सहाय्याने डोंबिवली पश्चिम येथील शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.


या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक १९२/२०२६, सीआरपीसी कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे. पोलीसांच्या माहितीनुसार, मयताच्या मृत्यूबाबत सध्या कोणाविरुद्धही तक्रार नसल्याची नोंद करण्यात आली आहे.
मयताचे वर्णन : मिशी वाढलेली असून ती काळी व पांढरी आहे. उपलब्ध वर्णनानुसार अंगात काळ्या रंगाचा शर्ट व तपकिरी रंगाची पॅन्ट असल्याचे नमूद करण्यात आले असून, उजव्या हातात लोखंडी कडे आणि लाल धागा बांधलेला आहे.


मयताची ओळख पटविण्यासाठी मानपाडा पोलीसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. या वर्णनाशी साधर्म्य असलेल्या व्यक्तीबाबत कोणाला माहिती असल्यास त्यांनी तात्काळ मानपाडा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ पाऊलबुद्धे यांच्याशी ९८६०३४८६१० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे पोलिसांनी कळविले आहे.