CRIME BORDER | 30 September 2026 | 02:27 PM
कल्याण :- रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्स आणि डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण येथील आयडियल कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्चमध्ये नेत्रतपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हे शिबिर महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराला महाविद्यालयीन स्तरावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, दिवसभरात एकूण २०४ जणांची यशस्वी नेत्रतपासणी करण्यात आली. डॉ. अगरवाल्स आय हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने डोळ्यांची तपासणी करून उपस्थितांना दृष्टी सुरक्षेबाबत योग्य मार्गदर्शन केले.
हे शिबिर प्रोजेक्ट हेड रो. सिद्धी पेंढारकर, क्लबचे अध्यक्ष रो. सीए उज्ज्वल ठोंबरे आणि सचिव रो. शैलेश गोर यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित करत अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम पुढेही राबवले जातील, असा मानस यावेळी आयोजकांनी व्यक्त केला.