CRIME BORDER | 26 December 2025 | 06:22 PM
पत्रपेटी - दि:-०९-११-२०२१ VIRAL SOCIAL MEDIA NEWS
महाराष्ट्र राज्यचे मुख्यमंत्री मा-उद्धवजी ठाकरे साहेब मा-गृहराज्यमंत्री साहेब
मा - महिला आयोग मा-कल्याण परिमंडळ-३-पोलीस आयुक्त साहेब
मा - पालिका आयुक्त साहेब मा-बाजारपेठ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब
मा - कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब
मा - सर्व संपादक पत्रकार प्रतिनिधी साहेब
नमस्कार सन्माननीय मंडळी मी त्रस्त निस्वार्थ निर्भीड स्वयंघोषित समाजसेविका पत्रकार चारुशीला पाटील- दि:-१४-०१-२०१९-रोजी मला खंडणीच्या खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्यात आले होते.यामध्ये पालिकेचे तत्कालीन अधिकारी-सु रा पवार-शरद पाटील भागाजी भांगरे-वसंत भोंगाडे अनधिकृत बांधकाम व्यवसायिक व माझ्याकडून-ज्यांनी ज्यांनी उसने पैसे घेतलेले ते काही विविध पक्षातील नगरसेवक विविध पक्षातील पदाधिकारी अनधिकृत बांधकाम व्यवसायिक व काही पत्रकारांनी मला खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवले.
मला मा-न्यायालयाने जामीन दिलेला आहे.मी अत्यंत बिकट परिस्थिती मधून जीवन प्रवास करत आहे जगावं की मरावं हा एक मोठा प्रश्न सध्या माझ्यासमोर आहे? कारण समाजातील पांढरपेशा अनेक लोकांनी माझ्या कडून लाखो उसने रुपया माझ्या कॅनरा बँक अकाऊंट क्र-७३२९९-मधून घेतलेले आहेत काही पत्रकार पत्रकरिता न करता अनधिकृत बांधकामांना आर्थिक रित्या संरक्षण देऊन अनधिकृत बांधकाम धारक व पालिका अधिकाऱ्यांना मदत करतात या सर्वांची सखोल चौकशी व्हावी मला योग्य तो न्याय मिळावा म्हणून मी अर्ज केला होता.या काळात covid-19-कोरोना विषाणूंमुळे सर्वांचे जीवन अस्ताव्यस्त झाले होतं पण आता जीवन पुन्हा सुरळीत होत असताना मला न्यायाची अपेक्षा आहे.
मी केलेल्या अर्जांची सखोल चौकशी होऊन योग्य तो न्याय मला मिळावा मी चुकीची असेल तर मा न्यायालयाने मला फाशी द्यावी अशी मी अपेक्षा करतो.प्रभारी प्रभाग क्षेत्र अध्यक्षांच्या व काही पत्रकारांच्या व अनधिकृत बांधकाम दारांच्या आर्थिक पुढाकाराने अनेक प्रभागांमध्ये कोरोना काळामध्ये शेकडो-तळ+१-२- नवीन अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत वेळो-वेळी महापालिका आयुक्त यांना तक्रारदाराच्या तक्रारीनुसार तक्रार निदर्शनास आणून देण्याचे काम करण्यात आलेले आहे पण या वरती कारवाई शून्य का??
या सर्व गोष्टींचा मला खूप त्रास होत आहे काही लोक मला आत्महत्येस प्रवृत्त करतात आजही मी दडपणाखाली जगत आहे खरे काय खोटे काय सर्वांना माहीत आहे सर्वांचेच हात आर्थिक रित्या बरबटलेले आहेत व्हाईट कॉलर म्हणणारे यांचेही हात बरबटलेले आहेत.आजही बिनदिक्कतपणे अनधिकृत नवीन बांधकामे उभी राहत आहेत निदर्शनास आणून देणाऱ्यांवरती व तक्रारदारान वरती खोटे खंडणीचे गुन्हे दाखल होत आहेत याला खरे कारण काय जबाबदार कोण???
निस्वार्थ निर्भीड स्वयंघोषित समाजसेविका पत्रकार- चारुशीला पाटील-