CRIME BORDER | 06 October 2026 | 12:34 PM
अवती भवती दिसते
फक्त प्लास्टिक प्लास्टिक
असेच सुरू राहिले तर
आपली होईल मग स्टीक
मानव सोडा गुरें ढोरें
खाऊन राहिले
त्यांच्याही आयुष्याचे करतो
आपण प्लास्टिक प्लास्टिक
सरकारी नियम राहती
पेपरवरती पण
याला खरे जबाबदार
असतो आपण
चला ठरवूनी सोडू आपण
प्लास्टिक प्लास्टिक
नुसती घोषणा नको
होऊयात यावर स्ट्रीक्ट
- दीपक मधुकर कांबळी