CRIME BORDER | 11 October 2026 | 06:17 PM
पत्रपेटी
‘फ’ प्रभाग क्षेत्र कल्याण डोंबिवली महानगरपालिका या कार्यक्षेत्रात स्टेशन परिसर ते ९० फ़ीट ठाकुर्ली या परिसरात छोटे फळ विक्रेते भाजीविक्रेते तसेच इतर फेरीवाले यांनी सेफ्टी वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक,अध्यक्ष विशाल शेटे यांच्याकडे ‘ फ ‘ प्रभाग क्षेत्र येथे कार्यरत असलेले सह पथक प्रमुख वेदपाल यांच्या तक्रारीचा पाढा वाचला आहे.वेदपाल हे फेरीवाले यांना दरमहा ठराविक रकमेची मागणी केली आहे तसेच नाही दिल्यास माल जप्ती तसेच तोडक कारवाईच्या धमकी वाजा इशारा दिला आहे.तसेच पुन्हा कधी धंदा करू दिला जाणार नाही अशी भीती दाखवून त्यांना आर्थिक व मानसिक त्रास दिला जात आहे तसेच ठाकुर्ली येथे बांबूचे शेड उभारून सरासपणे चिकन सेंटर उभारलेले आहेत यांच्याकडून रोज पार्टीसाठी फुकट चिकन घेऊन जाण्यात येत आहे व मोठ्या रकमेची दरमहा हप्ता मागण्यात आला आहे.
सदर फेरीवाले व व्यावसायिक उघडपणे तक्रार करण्यास धास्तावत आहेत कारण त्यांच्या उपजीविकेसाठी त्यांना धंदा करायचा आहे त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे म्हणून सर्व फेरीवाले यांनी विशाल शेटे यांच्याशी संपर्क करून सह पथक प्रमुख वेदपाल हा एक सफाई कामगार आहे पण सध्या त्याची नेमणूक फ प्रभाग क्षेत्रात फेरीवाला सह पथक प्रमुख या पदावर केलेले आहे. या पदाचा गैरवापर करून हा स्टेशन परिसरातील तसेच येथील सर्व फेरीवाले यांच्याकडून दरमहा हप्त्याची मागणी करत आहे व न दिल्यास त्यांना त्रास देत आहे अशी तक्रार विशाल शेटे यांनी फेरीवाल्यांच्या तक्रारीवरून फ प्रभाग क्षेत्र अधिकारी व कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या कडे लेखी स्वरुपात तक्रार केलेली आहे व फेरीवाला सह पथक प्रमुख वेदपाल यांना तातडीने या पदावरून हकालपट्टी करून त्यांची पालिकेच्या इतर कोणत्याही कमी जबाबदारीच्या विभागात बदली करावी व त्यांची संपूर्णपणे निष्पक्ष चौकशी करावी प्रशासनाने यावर लवकरात लवकर योग्य कायदेशीर पावले उचलावी अन्यथा सर्व सामान्य डोंबिवलीकरांच्या नाय हक्कासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडावे लागेल असे विशाल शेटे यांनी सांगितलेले आहे तसेच डोंबिवली स्टेशन परिसरातील व इतर फुटपाट जर मोकळा करायचा असेल तर हे असे हफ्तेखोर सहपथक प्रमुख जर नेमले तर कशा पद्धतीने फेरीवाले मुक्त फूटपाट होतील जर हेच त्यांना पैसे घेऊन अभय देत असतील तर अशा कर्मचाऱ्यांची तातडीने निलंबन करण्यात यावं अशी ठाम भूमिका सेफ्टी वेल्फेअर असोसिएशन च्या संस्थापक,
अध्यक्ष, विशाल शेटे यांनी मांडली आहे