CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 
Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्सच्या 'संक्रमण' प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सामाजिक प्रकल्पांसाठी उभारला निधी

CRIME BORDER | 15 October 2026 | 10:25 AM

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्सच्या 'संक्रमण' प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सामाजिक प्रकल्पांसाठी उभारला निधी

डोंबिवली :- रोटरी क्लब ऑफ डोंबिवली विनर्सतर्फे डोंबिवली (पूर्व) येथील ब्राह्मण सभा हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेले दोन दिवसांचे "संक्रमण" प्रदर्शन १० आणि ११ ऑक्टोबर २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. 'वामन हरी पेठे ज्वेलर्स'चे सहकार्य लाभलेल्या या यशस्वी निधी संकलन उपक्रमाने स्थानिक कारागीर आणि उद्योजकांना एक उत्तम व्यासपीठ मिळवून दिले. या प्रदर्शनात हस्तकला वस्तू, सणासुदीचे साहित्य आणि वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती मांडण्यात आल्या होत्या, ज्यांना वीकेंडला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद लाभला.

प्रदर्शनाचे अधिकृत उद्घाटन मुख्य अतिथी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. निलेश व्ही. जयवंत यांच्या हस्ते करण्यात आले. क्लबचे अध्यक्ष रोटेरियन सीए उज्ज्वल प्रकाश ठोंबरे यांनी नागरिक आणि स्टॉलधारकांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल मनापासून आभार मानले. या उपक्रमातून उभा राहिलेला निधी क्लबच्या आगामी सामाजिक, आरोग्य आणि शैक्षणिक प्रकल्पांसाठी वापरला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या उपक्रमासोबतच क्लबने पितृपक्षानिमित्त एक विशेष 'अन्नदान मोहीम'देखील राबवली, ज्याद्वारे वृद्धांच्या मदतीसाठी २०० किलोहून अधिक अन्नधान्य संकलित करण्यात आले.