CRIME BORDER | 15 October 2026 | 12:33 PM
डोंबिवली (प्रधान कचेरी) :- पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणारे "क्राईम बॉर्डर" च्या पुणे विभागीय संपादक पदावर राजगुरुनगर जि.पुणे येथे स्थायिक असलेले नितीन सैद यांच्या सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील कार्याची विशेष दखल घेऊन "क्राईम बॉर्डर" चे मुख्य संपादक राजेंद्र वखरे यांनी त्यांची मानसेवी नियुक्ती जाहीर केली आहे.
नितीन सैद यांना सामाजिक व पत्रकारीता,जनसेवेच्या कार्याची आवड असून गोरगरिबांसाठी "क्राईम बॉर्डर" व "पावन भूमी चॅरिटेबल ट्रस्ट" (एनजीओ) च्या माध्यमातून त्यांना सामाजिक कार्य करायचे आहे.त्यांच्या या निवडीने आप्त,मित्र परिवार व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.