CRIME BORDER | 29 October 2026 | 09:37 AM
डोंबिवली | क्राईम बॉर्डर न्यूज नेटवर्क :- लोकसेवेची निष्ठा, जनसामान्यांप्रती असलेली आत्मीयता आणि सामाजिक बांधिलकी यांच्या बळावर सार्वजनिक जीवनात आपला स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली पश्चिमेतील प्रभाग क्रमांक २१ च्या तरुण, तडफदार व कर्तव्यदक्ष भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका डॉ. सौ. रवीना राहुल म्हात्रे यांची ‘ह’ प्रभाग क्षेत्र समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
या आनंददायी आणि अभिमानास्पद प्रसंगी ‘क्राईम बॉर्डर’ मराठी.-हिंदी वृत्तपत्र व न्यूज पोर्टल, ‘श्री स्वामी सखा’ (मासिक), भरोसा फाउंडेशन आणि आश्रय महिला संस्था यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार श्री. राजेंद्र वखरे आणि संपादिका सौ. सीमा राजेंद्र वखरे यांनी नवनिर्वाचित सभापती डॉ. सौ. रवीना राहुल म्हात्रे यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला.
यावेळी भारतीय संस्कृतीतील आदर, स्नेह आणि मंगलभावनेचे प्रतीक असलेली शाल तसेच पवित्र तुळशीचे रोप सप्रेम भेट देऊन त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. त्यांच्या नव्या जबाबदारीसाठी मनःपूर्वक अभिनंदन करून उज्ज्वल आणि लोकाभिमुख भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या स्नेहपूर्ण भेटीप्रसंगी नगरसेविका डॉ. सौ. रवीना म्हात्रे यांचे पती श्री.राहुल श्रीधर म्हात्रे (कल्याण जिल्हा उपाध्यक्ष, युवा मोर्चा) यांचीही उपस्थिती लाभली.
या निवडीचे विशेष महत्त्व व्यक्त करताना श्री. राजेंद्र वखरे यांनी सांगितले की,
"लोकप्रतिनिधीपद हा केवळ सन्मान नसून जनतेने व्यक्त केलेल्या विश्वासाची आणि अपेक्षांची अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारी असते. सभापतीपदाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या संवेदनशीलतेने समजून घेऊन त्यांचे निराकरण करणे, विकासकामांना गती देणे आणि लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य देणे हीच खऱ्या अर्थाने यशस्वी लोकसेवेची ओळख ठरते.
आमच्या परिवारातील लाडक्या (भाचीबाई डॉ. सौ. रवीना राहुल म्हात्रे ) यांना हा बहुमान प्राप्त झाल्याचा आम्हाला विशेष आनंद आणि अभिमान वाटतो. त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करावा, महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घ्यावा आणि जनसेवेचा आदर्श निर्माण करावा, हीच आमची मनःपूर्वक सदिच्छा आहे."
याप्रसंगी सौ. सीमा राजेंद्र वखरे यांनीही डॉ.सौ. रवीना म्हात्रे यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
पदाचा सन्मान हा क्षणिक असतो; मात्र त्या पदाच्या माध्यमातून केलेली निःस्वार्थ जनसेवा समाजाच्या स्मरणात कायमस्वरूपी राहते. हाच आदर्श डोळ्यांसमोर ठेवून नवनिर्वाचित सभापती डॉ.सौ. रवीना राहुल म्हात्रे यांची पुढील वाटचाल अधिक यशस्वी, विधायक आणि लोककल्याणकारी ठरो, अशा सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
रवींद्रदादा चव्हाण यांचा विश्वास सार्थ ठरवून जनसेवेला सर्वोच्च प्राधान्य देणार – सभापती डॉ.सौ. रवीना राहुल म्हात्रे
यावेळी सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित सभापती डॉ.सौ. रवीना राहुल म्हात्रे यांनी आपल्या मनोगतातून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री.रवींद्रदादा चव्हाण यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
त्या म्हणाल्या, "भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली आम्ही यापुढेही प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्यरत राहू. त्यांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास आणि सोपवलेली जबाबदारी ही आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे. हा विश्वास आम्ही निश्चितच सार्थ ठरवू. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविणे, प्रभागातील विकासकामांना गती देणे, महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणे आणि प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्यरत राहणे, हेच आमचे प्रमुख ध्येय असेल. पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली आणि जनतेच्या सहकार्याने ‘ह’ प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."
जनतेचा विश्वास, पक्षनेतृत्वाचे मार्गदर्शन आणि विकासाची दूरदृष्टी या त्रिसूत्रीच्या बळावर ‘ह’ प्रभागाच्या विकासाला नवी दिशा देण्याचा निर्धार नवनिर्वाचित सभापती डॉ. सौ. रवीना राहुल म्हात्रे यांनी यावेळी व्यक्त केला.
रवींद्रदादा चव्हाण यांचा विश्वास सार्थ ठरवून जनसेवेला सर्वोच्च प्राधान्य देणार – सभापती सौ. रवीना राहुल म्हात्रे
यावेळी सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित सभापती सौ. रवीना राहुल म्हात्रे यांनी आपल्या मनोगतातून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्रदादा चव्हाण यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.