CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

फुलगाव उड्डाणपुलाखाली थरार! २८ वर्षीय युवकावर गोळीबार

लोखंडी रॉडने डोक्यावर आणि गावठी कट्ट्यातून झाडली गोळी; जखमीला जिल्हा रुग्णालयात हलविले

CRIME BORDER | 02 November 2026 | 09:32 AM

फुलगाव उड्डाणपुलाखाली थरार! २८ वर्षीय युवकावर गोळीबार

भुसावळ तालुका प्रतिनिधी । सुरेश कोळी

वरणगाव नजीक फुलगाव उड्डाण पुलाखालील बायपास रस्त्यावर एका २८ वर्षीय युवकावर लोखंडी रॉडने हल्ला करून गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आल्याची गंभीर घटना रविवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर वरणगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले. हल्ला करणारे तिन्ही अज्ञात आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून, पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सरफराज सैय्यद बशीर सैय्यद (वय २८, रा. मुक्ताईनगर) हा युवक भुसावळ येथील बी. एन. अग्रवाल यांच्याकडे वाहनचालक म्हणून कामाला आहे. काम आटोपून तो दुचाकीने मुक्ताईनगर येथे घरी जात असताना त्याला वाटेत एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. त्यानंतर तो नेहमीच्या मार्गाने उड्डाण पुलावरून न जाता पुलाखालील बायपास रस्त्याने जात असताना आधीच दबा धरून बसलेल्या दुचाकीवरील तिघांनी त्याला अडविले.

यावेळी संशयितांनी त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केले, तसेच गावठी कट्ट्यातून पोटावर गोळी झाडली. या हल्ल्यात तो गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळला. हल्ल्यानंतर तिन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीला तातडीने वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, गोळीबाराच्या या घटनेमुळे वरणगाव परिसरात खळबळ उडाली असून, हल्ल्या मागील कारण आणि आरोपींची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. तर या घटनेचे कारण गुलदस्त्यात असून रात्री उशिरापर्यंत वरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते .

घटनास्थळी पोलीसांची धाव

गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल , मुक्ताईनगर पोलीस उपविभागीय अधिकारी नंदराज पाटील तसेच वरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस सुखराम सावकारे, ईश्वर तायडे, गोपी सोनवणे यांचेसह इतर पोलीस बांधवांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हल्लेखोर आरोपींच्या तपासाला गती दिली आहे .