CRIME BORDER 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

मुख्य संपादक : राजेंद्र वखरे 

संपादिका  : सौ. सीमा राजेंद्र वखरे 

पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणाऱ्या क्राईम बॉर्डर साठी डॅशिंग तरुण / तरुणी क्राईम रिपोर्टर पदी  तत्काळ नियुक्त करणे आहे.  इच्छुकांनी संपर्क साधावा . Mob . :- 9619630035 / 9987496136

UPSC, Shivam Vakhare (यु .पी .एस .सी ) च्या सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डोंबिवली (महाराष्ट्र ) येथील कु. शिवम सीमा राजेंद्र वखरे  यांनी  ६५१ रँक मिळवून यश संपादन केले .
 

 

Important: रजिस्ट्रेशन के लिए यहाँ क्लिक करें
Register

लोणावळ्यात राष्ट्रीय एकता दिवस साजरा; एलईडी स्क्रीनवर 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' येथील मुख्य सोहळ्याचे थेट प्रक्षेपण

CRIME BORDER | 02 November 2026 | 10:00 AM

लोणावळा शहर पोलीसांच्या वतीने राष्ट्रीय एकता दिवसाचे एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपण करताना नागरिक
लोणावळा शहर पोलीसांच्या वतीने राष्ट्रीय एकता दिवसाचे एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपण करताना नागरिक

लोणावळा (प्रतिनिधी श्रावणी कामत) :- भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती आणि माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त लोणावळा शहर पोलीस स्टेशन (पुणे ग्रामीण) च्या वतीने राष्ट्रीय एकता दिवसाचे आयोजन करण्यात आले.

पोलीस निरीक्षक श्री. महेश विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विशेष एलईडी स्क्रीन लावण्यात आली होती. या स्क्रीनवर गुजरातच्या एकता नगर (श्री विजयपुरम - स्टॅच्यू ऑफ युनिटी) येथे होणारा राष्ट्रीय एकता दिवसाचा मुख्य शासकीय सोहळा लोणावळेकर नागरिकांसाठी थेट (लाईव्ह) दाखवण्यात आला.

यावेळी एकतेचा संदेश देण्यात आला. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा लाईव्ह सोहळा पाहिला.